Home /News /crime /

एका पिझ्झासाठी गाठला क्रूरतेचा कळस; बापाने जमिनीवर आदळून केली 6 महिन्यांच्या बाळाची हत्या

एका पिझ्झासाठी गाठला क्रूरतेचा कळस; बापाने जमिनीवर आदळून केली 6 महिन्यांच्या बाळाची हत्या

इवेंडर विल्सन (Evander Wilson) याने पिझ्झा ऑर्डर केला होता. जेव्हा पिझ्झा डिलिव्हर झाला तेव्हा तो हे पाहून भडकला की पिझ्झाही चुकीचा दिला गेला आहे आणि यात कोल्ड ड्रिंकची बॉटलही नाही

    सिडनी 02 डिसेंबर : एका व्यक्तीने अगदी क्षुल्लक कारणावरुन आपल्याच मुलाची हत्या (Father Killed Son for Pizza) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा बाप या गोष्टीमुळे नाराज होता की त्याला चुकीचा पिझ्झा डिलिव्हर (Pizza Delivery) करण्यात आला होता आणि त्यामध्ये कोल्ड ड्रिंकची बॉटलही (Cold Drink Bottle) नव्हती. आधी या व्यक्तीने आपल्या पत्नीला अमानुष मारहण केली आणि यानंतर मुलाची हत्या केली. त्याची बायको मोठमोठ्याने रडत आणि ओरडत होती, मात्र निर्दयी बापाने डोळ्यादेखतच मुलाचा जीव घेतला. ही घटना ऑस्ट्रेलियामधील आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, विक्टोरियामध्ये राहणाऱ्या चेल्सी स्मिथ (Chelsea Smith) हिने सांगितलं की तिचा पती इवेंडर विल्सन (Evander Wilson) याने पिझ्झा ऑर्डर केला होता. जेव्हा पिझ्झा डिलिव्हर झाला तेव्हा तो हे पाहून भडकला की पिझ्झाही चुकीचा दिला गेला आहे आणि यात कोल्ड ड्रिंकची बॉटलही नाही. यानंतर त्याने आपल्या मुलांसमोरच चेल्सीला मारायला सुरुवात केली. आरोपीने आपल्या पत्नीचे केस पकडून तिला ओढलं आणि तिच्या चेहऱ्यावर बुक्क्यांनी मारा केला. एवढ्यावरच तो शांत बसला नाही तर यानंतर त्याने आपल्या सहा महिन्याच्या मुलाला उचललं आणि हवेत फेकलं. बराच वेळ तो असंच करत राहिला. यादरम्यान डोकं जमिनीवर आदळून बाळाचा मृत्यू झाला. बाळाची अवस्था पाहून आरोपी थांबला आणि लगेचच त्याला रुग्णालयात घेऊन गेला. मात्र 45 मिनिटाच्या आतच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितलं की डोक्याला मार लागल्यामुळे बाळ सदम्यात गेलं आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन आठवडे बाळाची आई चेल्सी शांतच राहिली. मात्र, नंतर हिंमत करून तिने पोलिसांनी संपूर्ण घटना सांगितली. कोर्टाने याप्रकरणी इवेंडर विल्सन याला दोषी ठरवत तुरुंगात त्याची रवानगी केली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या