• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • पती-पत्नीच्या भांडणात 9 महिन्यांच्या बाळाचा बळी, दांडक्याने मारून घेतला जीव

पती-पत्नीच्या भांडणात 9 महिन्यांच्या बाळाचा बळी, दांडक्याने मारून घेतला जीव

आपल्या पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग 9 महिन्यांच्या बाळावर काढत तरुणाने (Father beats son to death) त्याला दांडक्याने मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

 • Share this:
  रायपूर, 17 ऑक्टोबर : आपल्या पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग 9 महिन्यांच्या बाळावर काढत तरुणाने (Father beats son to death) त्याला दांडक्याने मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. पत्नीसोबत झालेल्या वादानंतर राग डोक्यात गेलेला हा तरुण त्याच्या मुलाकडे गेला आणि त्याला (Beat son after fight with wife) दांडक्याने चोप दिला. 9 महिन्यांच्या या बाळाला हा मार सहन न झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी (Police arrested murderer father) दाखल झाले असून त्यांनी आरोपी बापाला अटक केली आहे. संशयावरून भांडणं छत्तीसगडमधील अमरपूरमध्ये राहणारा आरोपी रमेश नगसिया शेजारच्या गावात विजयादशमी साजरी करण्यासाठी गेला होता. रात्री उशिरा तो घरी परतला. घरी आल्यावर पत्नीने त्याच्यावर संशय घेतला. दुसऱ्या गावातील महिलेसोबत पतीचे अनैतिक संबंध असून त्यासाठीच तो दिवसभर घराबाहेर असल्याचा आऱोप पत्नीने केला. या आरोपानंतर पती आणि पत्नीमध्ये जोरदार भांडण पेटलं. भांडणाचा राग मुलावर हे भांडण विकोपाला गेलं आणि पती रागाने थरथरू लागला. त्याचवेळी त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा तिथे आला आणि रडू लागला. भांडणाचा सगळा राग पतीने आपल्या बाळावर काढला. त्याने शेजारी पडलेलं दांडकं उचलून मुलाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत वर्मी घाव लागल्यामुळे मुलाने जागीच प्राण सोडले. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे. हे वाचा- Work From Home करणाऱ्या 41 टक्के जणांना मणक्यांचे आजार, वाचा नवं संशोधन गुन्हा दाखल पोलिसांनी बापावर मुलाचा खून केल्याचा आरोप दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात बापाने मुलाचा जीव घेतला. पोलिसांनी या प्रकरणी कुटुंबीयांचे जबाब घेतले असून पुढील कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आईबापाच्या भांडणात निष्पाप मुलाचा जीव गेला आहे.
  Published by:desk news
  First published: