Home /News /crime /

तुरीच्या पिकासोबत शेतकऱ्याने केली कमाल, पोलीसही झाले हैराण

तुरीच्या पिकासोबत शेतकऱ्याने केली कमाल, पोलीसही झाले हैराण

राज्यात परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. उभी पिकं जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहे. मात्र...

चांदवड, 11 ऑक्टोबर : राज्यात परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. उभी पिकं जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये शेतकऱ्याचा प्रताप पाहून पोलिसांनी डोक्याला हात लावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दत्तू चौधरी असं या शेतकऱ्याचं नाव आहे. दत्तू चौधरी हे चांदवड तालुक्यातील कानमंडाळे गावात राहणारे आहे. चांदवडच्या कानमंडाळे भागात एका शेतकऱ्याने त्याच्या तुरीच्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली असल्याची माहिती नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. एसटी बसच्या दारातला उभं राहून काढला VIDEO, नवनीत राणा वादात त्यानंतर  पोलीस अधिक्षक सचिन पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक  शर्मिष्ठा वालावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के.के.पाटील  उपनिरीक्षक गुजर , पो.ह.गोसावी,चव्हाणके,मर्कड, टर्ले, खांडेकर, वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे सहा.पो.निरी गणेश गुरव, सहा.पोउपनिरी शेख पो.ह. वाघ, भोळे आदींच्या पथकाने शेतात जाऊन पाहणी केली असता त्यांना तुरी सोबत गांजाची झाडांची लागवड करण्यात आल्याचे दिसून आले. तुरीच्या शेतात थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 230 झाडे लावण्यात आली होती.  दत्तू चौधरीचा प्रताप पाहून पोलीसही हैराण झाले.  पोलिसांनी तुरीच्या शेतातून गांजाची तब्बल 230 झाडे जप्त केली. शेतात गांजाची झाडे लावल्याप्रकरणी दत्तू चौधरी या शेतकऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणी दत्तू चौधरी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात आणखी कुणी गांजाची लागवड केली आहे का? याचा पोलीस तपास करीत आहे. कानमंडाळे गावातील शेतामध्ये गांजाची शेती करण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Nashik

पुढील बातम्या