रायपूर, 10 जानेवारी: आपल्या शेतात (Farm) सतत उडणाऱ्या धुळीमुळे (Dust) वैतागलेल्या शेतकऱ्याने (Farmer) खाण मालकाचा (Stone mine owner) निर्घृण खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेताच्या शेजारीच दगड आणि मुरुम फोडण्यासाठी लावलेल्या क्रेशरमुळे शेतकऱ्याचं नुकसान होत होतं. त्यासाठी व्यापाऱ्याला नुकसान भरपाई वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यानं केली होती. मात्र त्याबाबत सहमती न झाल्यामुळे व्यापाऱ्यावर राग मनात धरत शेतकऱ्याने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. काय आहे प्रकरण?छत्तीसगडमध्ये रायगढपासून काही अंतरावर खरसिया गावात हा प्रकार घडला. राजेश अग्रवाल नावाचे व्यापारी दगडाची खाण चालवून इतरांना खडी पुरवण्याचं काम करत होता. मात्र यामुळे धुळीचे बारीक बारीक कण उडून ते शेजारच्या शेतात पडत असत. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत होतं. खाणीच्या शेजारी धोबी राम नावाच्या शेतकऱ्याची जमीन होती. क्रेशरमुळे होणाऱ्या नुकसानीच्या मोबदल्यात व्यापारी राजेश अग्रवाल हा धोबी रामला दरमहा 15 हजार रुपये नुकसान भरपाई देत असे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही नुकसान भरपाई वाढवून द्यावी, अशी मागणी धोबी रामने लावून धरली होती. तर देत असलेली नुकसान भरपाई पुरेशी असून यापेक्षा अधिक देऊ शकत नसल्याचं राजेश अग्रवाल यांनी सांगितलं होतं. या मुद्द्यावरून राजेश अग्रवाल यांचा खून करण्याची योजना शेतकरी धोबी रामने आखली. कुऱ्हाडीने केेले वारव्यापारी राजेश अग्रवाल नेहमीप्रमाणे त्याच्या डस्टर गाडीतून खाणीकडे आला. गाडी पार्क करून चालत तो खाणीच्या दिशेनं जात असताना दबा धरून बसलेल्या धोबी रामने आपल्या कुऱ्हाडीने राजेश यांच्या गळ्यावर वार केले. वर्मी घाव लागल्याने राजेश यांचा मृत्यू झाला. तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राजेश यांना पाहून आरोपी धोबी राम जंगलात पळून गेला. पोलीस तपास सुरूपोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला. यावेळी चौकशी केली असता शेजारच्या शेताचा मालक धोबी राम आणि राजेश यांचा वाद सुरू असल्याची माहिती त्यांना समजली. त्यावरून पोलिसांनी माग काढत धोबी रामला जंगलातून अटक केली. त्याने हत्येची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचा -
व्यापाऱ्यांचे आंदोलनआरोपीला अटक झाली असली, तरी व्यापाऱ्यांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण नसल्याचा मुद्दा सांगत त्यांनी आपली दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या हत्येमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.