मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रसिद्ध अभिनेत्रीचा माजी मंत्र्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; जबरदस्तीनं गर्भपातही केला

प्रसिद्ध अभिनेत्रीचा माजी मंत्र्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; जबरदस्तीनं गर्भपातही केला

Famous Actress Sexual Harassment Case: एका प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्नाचं आमिष (lure of marriage to actress) दाखवून तिचं पाच वर्षे लैंगिक शोषण (Sexual Relation) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून एक माजी मंत्री (Former Minister) आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

चेन्नई, 29 मे: एका प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्नाचं आमिष (lure of marriage to actress) दाखवून तिचं लैंगिक शोषण (Sexual Relation) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून एक माजी मंत्री (Former Minister) आहे. याप्रकरणी पीडित अभिनेत्रीनं पोलिसांत गुन्हा दाखल केला असून दोघांचे सोबतचे काही फोटोज पुरावे म्हणून पोलिसांत दिले आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केली नसून या घटनेचा तपास सुरू आहे.

संबंधित पीडित अभिनेत्री तमिळ चित्रपटसृष्टीशी (Tamil Film) संबंधित असून  तिने अण्णा द्रमुकचे माजी मंत्री डॉ. मणिकंदन (Manikandan) यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR) केला आहे. तिचे मागील काही वर्षांपासून डॉ. मणिकंदन यांच्याशी प्रेमसंबंध (Love affair) असल्याचा आरोपही पीडित अभिनेत्रीने केला आहे. ही अभिनेत्री मुळ मलेशिया या देशाची असून मागील काही वर्षांपासून ती तमिळ चित्रपटसृष्टीत काम करते.

दैनिक सामनाने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित अभिनेत्री 2017 मध्ये पहिल्यांदा मणिकंदन यांना भेटली होती. तेव्हापासूनच दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले होते. दरम्यानच्या काळात मणिकंदन यांनी लग्नाचं आमिष दाखवून संबंधित अभिनेत्रीशी अनेकदा शारीरिक संबंधही ठेवले. गेल्या पाच वर्षापासून त्यांचे संबंध सुरू होते. पण अलीकडे जेव्हा अभिनेत्रीनं लग्नाबाबत विचारलं तेव्हा मणिकंदन यांनी लग्न करण्यास नकार दिला, असंही अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

हे ही वाचा-संतापजनक! झाड तोडण्यास नकार देणाऱ्या दलिताच्या गरोदर पत्नीवर मुलांसमोरच बलात्कार

त्याचबरोबर, मणिकंदन यांच्या प्रेमसंबंधातून पीडित अभिनेत्री गर्भवती झाली असता, तिला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला. त्याच बरोबर घटनेची वच्याता कुठेही केली, तर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकीही मणिकंदन यांनी दिली असल्याचं अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिवाय पुरावा म्हणून तिने मणिकंदन यांच्यासोबतचे काही फोटोही पोलिसांना दिले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Rape, South actress, Tamilnadu