Home /News /crime /

'दृश्यम' सिनेमातून प्रेरणा घेत कुटुंबाने केला गुन्हा; एका चुकीमुळे पोहोचले गजाआड

'दृश्यम' सिनेमातून प्रेरणा घेत कुटुंबाने केला गुन्हा; एका चुकीमुळे पोहोचले गजाआड

चित्रपटात नायक आणि त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य पोलिसांसमोर प्रत्येक चौकशीत एकच गोष्ट वारंवार सांगत असतात, जेणेकरून हे खरं वाटेल. असं करतच ते पोलिसांच्या तावडीतून वाचतात.

    बंगळुरू 29 जानेवारी : गुन्हेगारीच्या थक्क करणाऱ्या घटनांवर अनेकदा चित्रपट बनवले जातात (Movies Based on True Incident). तर, अनेकदा चित्रपट पाहून गुन्हेगार आपल्या योजना बनवतात. बंगळुरूमधून सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. इथे एका कुटुंबाने दृश्यम सिनेमातून प्रेरणा घेत गुन्ह्याचं प्लॅनिंग (Drishyam Style Crime) केलं, मात्र ते पोलिसांच्या तावडीत सापडलेच. दृश्यम सिनेमामध्ये या चित्रपटाचा नायक आपल्या कुटुंबासोबत मिळून असं प्लॅनिंग करतो, की गुन्हा केलेला असतानाही पोलीस त्याला पकडू शकत नाहीत. मात्र, खऱ्या आयुष्यात असं शक्य नाही. चित्रपटात नायक आणि त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य पोलिसांसमोर प्रत्येक चौकशीत एकच गोष्ट वारंवार सांगत असतात, जेणेकरून हे खरं वाटेल. असं करतच ते पोलिसांच्या तावडीतून वाचतात. बंगळुरुच्या अनेकल भागात राहणाऱ्या एका कुटुंबाने आणि त्यांच्या दोन जवळच्या व्यक्तींनीही असाच प्रयत्न केला. मात्र, अखेर पोलिसांनी त्यांना पकडलंच. फोन कॉल करुन सेक्ससाठी महिलांची मागणी, शिवसेनेच्या विभागप्रमुखाला महिलेकडून चोप या घटनेत कुटुंब प्रमुख रविप्रकाश (55), त्याचा मुलगा मिथुन कुमार (30), सून संगीता, मुलगी आशा आणि जावई नल्‍लू चरण यांनी एक प्लॅन बनवला होता. यात मिथूनचा ड्रायव्हर दीपक आणि मित्र आसमा यांनीही साथ दिली. या टोळीने प्लॅन बनवून घरातील सोनं दलालाकडे गहाण ठेवलं आणि नंतर हे सोनं त्यांच्याकडून लुटलं गेलं असल्याची बतावणी केली. सोने लुटलं गेल्याचं नाटकही करण्यात आले. या टोळीच्या प्लॅनची ​​माहिती नसलेल्या पोलिसांनी तपास केला असता त्यांना काहीही हाती लागलं नाही. यानंतर टोळीनं मोठं नियोजन केलं. यामध्ये आशाने 19 सप्टेंबर 2021 रोजी सर्जापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, ती कपडे खरेदी करण्यासाठी दुकानात गेली असता तिची बॅग चोरीला गेली. बॅगेत 30 हजार रुपये रोख, मोबाईल फोन आणि 1250 ग्रॅम सोनं होतं. 'मुलगी काही संपत्ती नाही'; तांत्रिकाला 'कन्यादान' केल्यानंतर न्यायालयाने फटकारलं तिने सांगितलं की एक व्यक्ती कपड्याच्या दुकानात शिरला आणि बॅग घेऊन पळून गेला. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा कुटुंबीयांनीही अशीच माहिती दिली. मात्र पोलिसांना दीपकवर संशय आला. पोलिसांनी त्याची कडक चौकशी केली असता त्याने सर्व गुपिते उघड केली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या