मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! पोलीस बनून महिलेची फसवणूक; बनावट कागदपत्रे दाखवून ठेवले शारिरीक संबंध

धक्कादायक! पोलीस बनून महिलेची फसवणूक; बनावट कागदपत्रे दाखवून ठेवले शारिरीक संबंध

बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटच्या (Fake Instgram Acount) मदतीने एका तोतया पोलिसाने (Fake Police) महिलेची फसवणूक (farud) केली आहे. आरोपीने महिलेला खोटी माहिती देवून तिच्याशी शारिरीक संबंधही (Sexual Relation) ठेवले आहेत.

  • Published by:  News18 Desk

शिर्डी, 04 मार्च: बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटच्या (Fake Instgram Acount) मदतीने एका तोतया पोलिसाने (Fake Police) महिलेची फसवणूक (farud) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा तोतया पोलीस बीड येथील रहिवाशी असून त्याने खोटी माहिती देवून आणि बनावट कागदपत्रं (Fake Documents) दाखवून एका महिलेशी शारिरीक संबंध (Sexual Relation) ठेवले आहे. पीडित महिलेला त्यांच्याबद्दल संशय आल्यानंतर तिने त्याची कसून विचारपूस केल्यानंतर आरोपीचं बिंग फुटलं आहे. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेला मारहाण करीत पळ काढला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तोतया पोलीस अधिकाऱ्याचं नाव किरण महादेव शिंदे असं असून तो बीड जिल्ह्यातील हिवरापाडी येथील रहिवाशी आहे. त्याने मिशो अॅपच्या मदतीने महिलेशी ओळख केली होती. त्यानंतर आरोपीने महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी खोट्या ओळखपत्रापासून ते बनावट कागदपत्रंही पाठवली आहेत. विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने पीडितेशी अनेकदा शारिरीक संबंधही प्रस्थापित केले आहेत.

पीडित महिला विवाहित असून ती शिर्डी येथील रहिवाशी आहे. यामुळे आरोपीनेही आपण शिर्डी पोलीस ठाण्यात नोकरीस असल्याचं भासवून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले आहेत. तसेच तुझ्या नवऱ्याला सोडून दे, मी तुला सुखात ठेवेल, असं अश्वासनही या तोतयाने महिलेला दिलं होतं. त्याचबरोबर शिर्डी पोलिसांत आपली चांगली ओळख आहे. त्यामुळे येथे तुला पोलिसाची नोकरी मिळवून देण्यात मदत करतो, असं आमिषही आरोपीने महिलेलं दाखवलं होतं.

हे ही वाचा-संतापजनक! अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर चार मित्रांचा सामूहिक बलात्कार

यानंतर तो तोतया पोलीस असल्याचा संशय पीडित महिलेला आला. याप्रकरणी तिने आरोपीची कसून चौकशी केली असता, आरोपीने महिलेस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर पीडित महिलेनं आरोपी किरण महादेव शिंदे विरोधात राहाता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेची फिर्याद नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हे ही वाचा-पत्नीच्या पत्रिकेत 'मंगळ' नसल्याने पतीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव

आरोपीला अटक केल्यानंतर त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे बनावट पोलिसाचं ओळखपत्र, पोलीस गणवेश आणि फोटो सापडले आहेत. याप्रकरणी राहाता पोलिसांनी आरोपी तोतया पोलीस किरण शिंदे याच्या विरोधात भा द वि कलम 376, 419, 420, 170, 171, 323 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडोरे हे करीत आहेत.

First published:

Tags: Beed news, Crime news, Sexual relationship