मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ED चे अधिकारी असल्याचे सांगत छापेमारी, मुंबईत 25 लाख रुपये रोख, 3 किलो सोनं लुटलं

ED चे अधिकारी असल्याचे सांगत छापेमारी, मुंबईत 25 लाख रुपये रोख, 3 किलो सोनं लुटलं

मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Khushalkant Dusane

दिवाकर सिंग, प्रतिनिधी

मुंबई, 24 जानेवारी : ईडी म्हणजे सक्तवसूली संचलनालय या विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत मुंबईत कोट्यावधींची लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या झवेरी बाजार परिसरात ईडीच्या बनावट अधिकाऱ्यांनी छापा टाकून कोट्यावधींची लूट केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

4 अज्ञात लोकांनी एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा टाकला. तसेच स्वतःला ईडी अधिकारी असल्याचे सांगितले. आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यालाही बेड्याही घातल्या होत्या. यानंतर आरोपींनी कार्यालयातून 25 लाख रुपये रोख आणि ३ किलो सोने चोरून नेले.

सोन्याची एकूण किंमत एक कोटी 70 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 394, 506(2) आणि 120B अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

ईडीचे अधिकारी म्हणून 4 जण आले आणि मुंबईच्या झवेरी बाजार परिसरात त्यांनी छापा टाकला. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. ही घटना काल सोमवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - ज्या दुचाकीला हात दिला, ती स्पीड ब्रेकरवरून उडाली, शिक्षिकेचा जागीच मृत्यू

थेट स्वयंपाक घरातच डल्ला, चोरट्यांनी दागिन्यांची पोटली केली लंपास

स्वयंपाक खोलीच्या ओट्यावरून दागिन्यांची पोटली चोरल्याची घटना घडली. याठिकाणाहून तब्बल सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दागिन्यांची पोटली आणि रोख रक्कम हँडबॅगमध्ये ठेवून ती स्वयंपाक खोलीतील ओट्यावर ठेवली होती. यातच संधी साधून चोरट्याने स्वयंपाक खोलीतील स्लायडिंग खिडकीतून हात घालत दागिन्यांची पोटलीच लांबवली. यात दागिने व रोख रकमेसह 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेले. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्हाच्या कारधा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या गिरोला येथे अनिल अंबादास गुल्हाणे यांच्याकडे घडली आहे. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोराचा शोध घेत आहेत.

First published:

Tags: ED, Mumbai