मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पत्नीच्या समोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर कारखान्याच्या व्यवस्थापकाचं धक्कादायक कृत्य

पत्नीच्या समोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर कारखान्याच्या व्यवस्थापकाचं धक्कादायक कृत्य

ती चपलांच्या कारखान्यात काम करते. कारखान्याचा व्यवस्थापक जय प्रकाश याने 2 जुलै रोजी पत्नी आजारी असल्याचे सांगून तिला घरी बोलावले.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 17 जुलै : दिल्लीत एक धक्कादायक खळबळजनक घटना समोर आली आहे. बुटांच्या कारखान्याच्या व्यवस्थापकाने पत्नीसमोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यानंतर तिला विष देऊन तिला मारण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीनाची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील नांगलोई भागातील आहे. 15 जुलै रोजी एका व्यक्तीने पीसीआरला फोन करून आपल्या बहिणीवर बलात्कार झाल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. तसेच पीडितेला एम्स रुग्णालयात दाखल केले. यानंतर 16 जुलैला तिला शुद्ध आली. पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली आहे. तर त्याची पत्नी फरार आहे.

पीडितेने जबाबात धक्कादायक खुलासा -

शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने पोलिसांना सांगितले की, ती चपलांच्या कारखान्यात काम करते. कारखान्याचा व्यवस्थापक जय प्रकाश याने 2 जुलै रोजी पत्नी आजारी असल्याचे सांगून तिला घरी बोलावले. तसेच अल्पवयीन पीडिता त्याच्या घरी पोहोचल्यावर जय प्रकाशने पत्नीसमोर तिच्यावर बलात्कार केला. तसेच बलात्कारानंतर आरोपीने तिला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - प्रेमविवाहानंतरही पतीचे दुसऱ्या तरुणीशी अफेअर, पत्नीने बहिणीला ऑडिओ पाठवत उचलले टोकाचे पाऊल 

दरम्यान, पीडितेच्या जबाबावरुन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे. तर त्याची पत्नी ही फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. लवकरच तिला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published:

Tags: Crime news, Delhi, Rape news