Home /News /crime /

Facebook वर खुललं मैत्रीतून प्रेम, भेटण्यासाठी तरुणी पोहोचताच खोलीत केलं बंद आणि...

Facebook वर खुललं मैत्रीतून प्रेम, भेटण्यासाठी तरुणी पोहोचताच खोलीत केलं बंद आणि...

प्रथम फेसबुकच्या माध्यमातून कोलकाता येथील एका महिलेशी मैत्री केली, त्यानंतर त्या युवकाने त्या महिलेला भेटण्यास बोलावले आणि मैत्री कधी प्रेमात रूपांतर झाले समजलं नाही.

    मथुरा, 21 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मथुरामध्ये (Mathura) एका महिलेला फेसबुकवर (Facebook)  मैत्री करणं चांगलंच महागात पडलं आहे. फेसबुक मित्राने महिलेला भेटायला बोलावले आणि औषध देऊन तिला बेशुद्ध केले. तिच्यावर तीन दिवस बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्यानंतर महिलेला रेल्वे स्थानकावर सोडत तो तेथून पळून गेला. पीडितेने दिलेली महिला एकून जीआरपीला धक्का बसला. पोलिसांनी रेल्वे चाईल्ड लाईन व महिला हेल्पलाईनला बोलवून महिलेच्या स्वाधीन केले आहे, महिलेने दिलेल्या तहरीरच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बेशुद्ध केल्यानंतर महिलेचे हाल लोकांशी मैत्री करणं जितकं सोपं आहे तितकं फेसबुक लोकांसाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होत आहे. त्याने प्रथम फेसबुकच्या माध्यमातून कोलकाता येथील एका महिलेशी मैत्री केली, त्यानंतर त्या युवकाने त्या महिलेला भेटण्यास बोलावले आणि मैत्री कधी प्रेमात रूपांतर झाले समजलं नाही. ती महिला अनेक वेळा तरुणाला भेटत राहिली आणि एक असा काळा दिवस आला जेव्हा आरोपीने तिला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. महिलेने केले गंभीर आरोप जेव्हा या महिलेशी पोलिसांनी बोलणं केलं, तेव्हा महिलेने सांगितले की, 4 वर्षांपूर्वी मुकेश राणा नावाच्या व्यक्तीशी फेबसुकवर मैत्री झाली आणि त्याच्या प्रेमात पडले. आपला प्रियकर सैन्यात असल्याचेही या महिलेने सांगितले आहे. त्याने मला 16 तारखेला भेटायला बोलावले व माझ्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्याने मला मारहाण केली. त्याचबरोबर या महिलेचा असा आरोप देखील आहे की, गेल्या 4 वर्षांपासून तो सतत माझ्यावर शारीरिक अत्याचार करीत होता आणि तो पूर्ण झाल्यावर त्याने मला सोडले. आरोपी व्यक्ती विवाहित असून भरतपूरचा रहिवासी आहे. गुन्हा दाखल तो मला सोडून पळून गेला असेही महिला म्हणाली आहे. त्याने मला मारहाण केली आणि माझा फोन तोडला त्याने त्याचे सर्व पुरावे मिटविले. महिलेला जीआरपीमध्ये तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. रेल्वे चाइल्ड लाईनचे सदस्य बेबी चाईल्ड यांनी सांगितले की, महिलेच्या कुटूंबाला माहिती देण्यात आली आहे. विचारणा केली असता त्याने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या