Home /News /crime /

Facebook मैत्री पडली महागात, पैसेही गेले आणि गुपितही झालं उघड

Facebook मैत्री पडली महागात, पैसेही गेले आणि गुपितही झालं उघड

फेसबुकवरून मैत्री झालेल्या तरुणाने महिलेचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळले आणि त्यानंतर फोटोही व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे.

    रायपूर, 26 सप्टेंबर : फेसबुकवरून मैत्री झालेल्या तरुणाने महिलेचे अश्लिल फोटो (Facebook friend blackmails woman for 3 lakhs and made photos viral) व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळले आणि त्यानंतर फोटोही व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. फेसबुकवरून अनेक महिने (Facebook friend) ओळख असलेल्या या तरुणाने असे काही रंग दाखवले की महिलेचं जगणंच मुश्किल झालं. अशी झाली ओळख रायपूरमध्ये राहणाऱ्या 52 वर्षांच्या विवाहित महिलेची फेसबुकवरून सूरज चौरसिया नावाच्या तरुणाशी ओळख झाली. आपण अहमदाबादमधील आलोक टेक्कटाईल्स कंपनीत काम करत असल्याचं त्यानं सांगितलं होतं. त्यानंतर अनेक महिन्यांपासून दोघांमध्ये संवाद होत होता. महिलेलाही त्याच्यासोबत गप्पा मारणं आवडत होतं. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात आपली नोकरी गेल्याचं त्यानं सांगितलं. आपल्याला नोकरी मिळवून देण्याची मागणी त्याने महिलेकडे केली. महिलेनेही त्याच्यासाठी नवी नोकरी शोधण्याचं आश्वासन दिलं. अहमदाबादहून आला रायपूरला नोकरी मिळवण्यासाठी हा तरुण रायपूरवरून अहमदाबादला आला. महिलेनं त्याच्यासाठी नोकरी शोधायला सुरुवात केली. या काळात ही महिला तरुणाला भेटत होती. त्यावेळी त्याने महिलेचे काही अश्लिल फोटो काढले आणि स्वतःकडे ठेवले. काही दिवसांनी त्याने महिलेला फोन करून पैशांची आणि नव्या मोबाईलची मागणी केली. हे मिळालं नाही, तर फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. त्यामुळे धक्का बसलेल्या महिलेने त्याची मागणी पूर्ण करत त्याला पैसे आणि मोबाईल दिला. तरुण गेला पळून त्यानंतर हा तरुण रायपूरवरून पुन्हा अहमदाबादला पळून गेला. काही दिवसांनी पुन्हा त्याने फोन केला आणि 3 लाख रुपयांची मागणी केली. महिलेने दिलेल्या मोबाईलमध्ये आपल्याला नातेवाईकांचे फोन नंबर मिळाले असून आपण त्यांनाही ते फोटो पाठवू, अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने त्याला फोन-पे वरून 3 लाख रुपये पाठवून दिले. मात्र पैसे मिळूनही तरुणाने महिलेचे फोटो तिच्या मुलीला आणि जावयाला पाठवले. हे वाचा - धक्कादायक! बायकोच्या नाकाला चावा घेत पाडला तुकडा; कारण ऐकून पोलिसही चक्रावले पोलिसांत तक्रार या प्रकाराने वैतागलेल्या महिलेनं अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तरुणाचा शोध घ्यायला सुरवात केली आहे. फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेतल्याचं आणखी एक उदाहरण त्यातून समोर आलं. आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Facebook, Online fraud

    पुढील बातम्या