लखनऊ, 8 ऑक्टोबर : फेसुबक आणि इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीला पुढे (Facebook friend attacks girl’s face with blades) नेण्यास तरुणीनं नकार दिल्यामुळे तरुणानं तिच्या चेहऱ्यावर ब्लेडनं वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीच्या शेजारीच राहणारा हा तरुण फेसबुकवरून तिला फ्रेंड (Facebook friend turned attacker) रिक्वेस्ट पाठवत होता. तरुणीने ती स्विकारल्यानंतर त्यांचं संभाषण वाढत गेलं. मात्र तरुणाचा (Girl avoiding the boy) हेतू योग्य नसल्याचं लक्षात आल्यावर तरुणीने त्याला टाळायला सुरुवात केली होती.
फेसबुकवरून झाली मैत्री
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये कॉलेजच्या अखेरच्या वर्षात शिकणाऱ्या तरुणीवर परिसरातील शुभम नावाच्या तरुणाचं एकतर्फी प्रेम होतं. तरुणीशी ओळख वाढवण्यासाठी त्याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर काही वेळा ते दोघे प्रत्यक्ष भेटले. मात्र काही भेटींनंतर तरुणाचा हेतू योग्य नसल्याचं लक्षात आल्यामुळे तरुणीने त्याच्याशी बोलणं बंद केलं. ह
इतरांशी बोलण्यावर आक्षेप
तरुणी इतर मित्रांशी बोलत असताना शुभम त्याला आक्षेप घेत होता. मात्र त्याला न जुमानता त्याच्याकडे दुर्लक्ष करत तरुणीने इतरांसोबतची आपली मैत्री कायम ठेवली होती. तरुणीने आपल्याशी लग्नासाठी तयार व्हावं, असंही शुभमचं म्हणणं होतं. मात्र तरुणीला त्याच्याशी लग्न करण्यात रस नव्हता. त्याच्यापासून लांब राहणं आणि त्याला शक्य तेवढं टाळण्याचा प्रयत्न तरूणी करत होती.
चेहऱ्यावर केले वार
घटनेच्या दिवशी कामानिमित्त बाहेर पडलेल्या तरुणीपाशी शुभम पोहोचला आणि काहीही कळण्यापूर्वी तिच्या चेहऱ्यावर त्याने ब्लेडने वार केले. तू माझी झाली नाहीस, तर मी तुला कुणाचीही होऊ देणार नाही, असं ओरडत वार करून तो घटनास्थळावरून फरार झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी तरुणीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तरुणीच्या चेहऱ्यावर अनेक जखमा झाल्या असून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
हे वाचा - साताऱ्यात दिवसाढवळ्या हत्येचा थरार; टोळक्यानं भररस्त्यात तरुणाला दगडानं ठेचलं
पोलिसांत गुन्हा दाखल
पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून शुभमचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Attack, Crime, Uttar pardesh