Home /News /crime /

Pune News: 'केअर टेकर' बनून आले अन् लाखोंचा माल लुटला, वृद्धांना लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Pune News: 'केअर टेकर' बनून आले अन् लाखोंचा माल लुटला, वृद्धांना लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

चतुः श्रृंगी पोलिसांनी एका केअर टेकर टोळीचा पर्दाफाश (care taker gang expose) केला असून सहा जणांच्या मुसक्या (6 Arrest) आवळल्या आहेत. ही टोळी वयोवृद्ध लोकांच्या घरात शिरून दरोडा टाकत होते.

    पुणे, 05 मे: काही दिवसांपूर्वी पुण्यातील औंध भागात 3 अज्ञात चोरट्यांनी एका वयोवृद्ध दाम्पत्याच्या बंगल्यात दरोडा (Robbery) टाकला होता. यावेळी चोरट्यांनी वयोवृद्ध दाम्पत्याला बाथरूममध्ये कोंडून त्याच्या घरातील तब्बल 15 हजार 80 लाखांचा ऐवज लुटला होता. या प्रकरणी पीडित दाम्पत्याने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तपास करत असताना चतुः श्रृंगी पोलिसांनी एका केअर टेकर टोळीचा पर्दाफाश (care taker gang expose) केला असून सहा जणांच्या मुसक्या (6 Arrest) आवळल्या आहेत. त्यांच्याकडून पोलीसांनी एकूण 17 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चतुःश्रृंगी पोलिसांनी मागील एक महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून एकूण सहा जणांना अटक केली आहे. हे आरोपी वयोवृद्ध दाम्पत्याच्या घरात आचारी किंवा केअर टेकर म्हणून काम करायचे. काही दिवस काम केल्यानंतर ते वयोवृद्ध दाम्पत्याचा विश्वास संपादन करायचे. दरम्यान घरातील मौल्यवान गोष्टी कुठे आहेत, याचा तपास घेत असत. आणि एकेदिवशी आपल्या साथीदारांच्या मदतीनं घरात दरोडा टाकून लाखोंचा मुद्देमाल लुटून नेतं. याप्रकरणी पोलिसांनी औरंगाबाद, नाशिक, पैठण आणि जालना या भागातून सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. औरंगाबाद येथून संदीप हांडे (वय 25), किशोर चंघाटे (वय 21) आणि भोलेश उर्फ कृष्णा चव्हाण (वय 25) अशा तीन आरोपींना अटक केलं आहे. तर जालना येथून मंगेश गुंडे (वय 20) आणि राहुल बावणे (वय 22) आणि नाशिक येथून विक्रम थापा ऊर्फ बीके (वय 19) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन दुचाक्या, सोनं आणि हिऱ्याचे दागिने, आणि एक कॅमेरा जप्त केला आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 17 लाख रुपये एवढी आहे. हे वाचा-पुण्यात वृद्ध दाम्पत्याच्या बंगल्यात 16 लाखांची चोरी; चाकूच्या धाकाने लुटलं 25 मार्च रोजी पुण्यातील औंध परिसरातील सिंध सोसायटीतील एका बंगल्यात संदीप, मंगेश आणि राहुल यांनी वृद्ध जोडप्यास लुटलं होतं. रात्री 8 च्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या कुकला आणि या वयोवृद्ध जोडप्याला बाथरूममध्ये बंद केलं होतं. यानंतर या टोळीनं घरातील 15 लाख 80  हजाराचा ऐवज चोरला होता. यानंतर 73 वर्षीय पीडित महिलेनं चतुः श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Robbery Case

    पुढील बातम्या