वसई, 14 सप्टेंबर : वसई-विरारमध्ये महागड्या गाड्या चोरणाऱ्या त्रिकुटाचा तुळींज पोलिसांनी पर्दाफाश करून महागडी चोरलेली केटीएम कंपनीची बाईक पोलिसांनी उत्तरप्रदेशातून जप्त केली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील आचोळे येथून दीड ते अडीच लाखांची केटीएम कंपनीची बाईक 15 डिसेंबर 2019 मध्ये चोरीला गेली होती. तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे,अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर,उपअधीक्षक अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहिती नुसार, उत्तरप्रदेशातील चंदौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत युपीच्या पोलिसांनी तपासणी केली असता ती बाईक मुंबईतील असल्याचे समजले त्यांनी तुळींज पोलिसांना ही माहिती कळवली.
मगर आणि स्पीड बोटीमध्ये लागली थक्क करणारी रेस, VIDEO पाहून अंगावर येतील शहारे
पोलीस निरीक्षक पाटील यांनी राजेश कालपुंड, जितेंद्र बनसोडे, प्रमोद जाधव, यांचे पथक चंदौली गेले आणि आरोपींनी अटक केली. आरोपी नौशाद उर्फ बादशाह निजामुद्दीन अन्सारी (वय 20 ), किसन नरेंद्रमल्हा निषाद (20) आणि अभय अमरदेव तिवारी (20) अशा तिघांना अटक करून दीड लाखांची बाईक जप्त केली आहे.
लोकांची कामं न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही : कोर्ट
हे तिघे ही सराईत गुन्हेगार आहेत. या त्रिकुटाने भिवंडी तालुक्यात कुंभारवाडा, नारपोली, येथे बाईक चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. हे मुळचे बिहारचे असून हे तिघे आजूबाजूच्या गावात राहत होते. ते खास मुंबई मायानगरीत येवून महागड्या गाड्या चोरून ते आधी गिऱ्हाईक शोधून परराज्यात त्या बाईक विक्री करायचे. मात्र, त्यादिवशी त्यांचा प्रयत्न फसला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडले.
या तिघांनाही वसई न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.