मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुंबई : एक्स बॉयफ्रेंडचा बारबालेसह तिच्या बहिणीवर ब्लेडने हल्ला; धक्कादायक कारण समोर

मुंबई : एक्स बॉयफ्रेंडचा बारबालेसह तिच्या बहिणीवर ब्लेडने हल्ला; धक्कादायक कारण समोर

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बारबाला शुक्रवारी रात्री आपल्या बहिणीसोबत चारकोप इथल्या आपल्या घरी गेली. तिचा एक्स बॉयफ्रेंड आधीपासूनच इमारतीच्या खाली उभा राहिलेला होता

मुंबई 02 एप्रिल : मुंबईतील चारकोप येथील बारबाला आणि तिच्या बहिणीवर बेल्डने हल्ला (Attack on Bar Dancer in Mumbai) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बारबालेच्या एक्स बॉयफ्रेंडने दोघींवर हल्ला केल्याचा आरोप आहे. बारबेला आणि आरोपी प्रियकर हे मागील तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. सुरुवातीला त्यांचं बोलणंही होत असे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बारबाला आणि आरोपी यांच्यातील संबंध दुरावले होते आणि ते एकमेकांसोबतही बोलतही नव्हते. याच रागातून आरोपीने प्रेयसीसह तिच्या बहिणीवर ब्लेडने वार केला असल्याचा आरोप केला जात आहे (Mumbai Crime News).

शिक्षिका बाथरूममध्ये जाण्याआधी आत ठेवायचा मोबाईल अन्...; पुण्यातील अल्पवयीन मुलाचं धक्कादायक कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बारबाला शुक्रवारी रात्री आपल्या बहिणीसोबत चारकोप इथल्या आपल्या घरी गेली. तिचा एक्स बॉयफ्रेंड आधीपासूनच इमारतीच्या खाली उभा राहिलेला होता. दोघी घरी पोहोचताच आरोपीने ब्लेडने आधी प्रेयसीवर वार केले आणि नंतर तिला वाचवण्यासाठी आलेल्या तिच्या बहिणीवरही हल्ला केला. यानंतर आरोपी फरार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारबाला आणि आरोपी यांची गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांसोबत ओळख होती. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. परंतु मागील काही दिवसांत बारबालेने आरोपीसोबत बोलणं कमी केलं आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला. याचाच राग आरोपी प्रियकराला होता

दोन्ही बायका झाल्या एकदमच गुल, नवरा बनला एप्रिल फूल; पोलीस ठाण्यात गेलं प्रकरण

याच रागातून शुक्रवारी तो बारबालेच्या इमारतीखाली जाऊन उभा राहिला आणि ती घरी पोहोचताच ब्लेडने तिच्यावर हल्ला केला. यानंतर पीडितेची बहीण तिला वाचवण्यासाठी पुढे आली असता, त्याने तिच्यावरही वार केला आणि यानंतर आरोपी फरार झाला. सध्या पोलीस आरोपी संजय सुर्वे याचा शोध घेत आहेत.

First published:

Tags: Crime news, Mumbai News