मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Supreme Court नं बलात्कार प्रकरणातील आरोपीला विचारला असा प्रश्न, सगळेच झाले चकित

Supreme Court नं बलात्कार प्रकरणातील आरोपीला विचारला असा प्रश्न, सगळेच झाले चकित

न्यायालयानं आरोपीला सवाल केला, की तू पीडितेसोबत लग्न करणार का? महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक प्रोडक्शन कंपनीत टेक्निशियन असणाऱ्या आरोपी मोहित सुभाष चव्हाणच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना हा सवाल केला गेला आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 01 मार्च : बलात्काराप्रकरणी सुरू असलेल्या एक सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court)आरोपीला एक असा सवाल केला ज्यानं सगळेच हैराण झालं. न्यायालयाच्या या प्रश्नानं सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आलं. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा हा आरोपी सरकारी कर्मचारी आहे. न्यायालयानं त्याला सवाल केला, की तू पीडितेसोबत लग्न करणार का? महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक प्रोडक्शन कंपनीत टेक्निशियन असणाऱ्या आरोपी मोहित सुभाष चव्हाणच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना हा सवाल केला गेला आहे. पोक्सो (Pocso Act) कायद्यांतर्गत मोहितवर बलात्काराचा आरोप आहे.

कोर्टाच्या कागदपत्रांनुसार पीडित मुलीने या प्रकरणी पोलिसांशी संपर्क साधला असता चव्हाणच्या आईने त्यांच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. परंतु पीडितेने नकार दिला. नंतर एका कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यात आली, की मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर दोघांचं लग्न होईल. मात्र, जेव्हा मुलगी 18 वर्षांची झाली तेव्हा आरोपीनं लग्नास नकार दिला आणि त्यानंतर पीडितेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मुख्य न्यायाधीश बोबडे यांनी आरोपीच्या वकिलांना सवाल केला, की आरोपी पीडितेसोबत लग्न करणार का? जर तो लग्नास तयार असेल तर आम्ही मदत करू शकतो. जर लग्न करणार नसेल तर त्याला आपली नोकरी गमवून तुरुंगात जावं लागेल. कारण त्यानं आधी मुलीला फसवलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

आरोपीच्या वकिलांनी म्हटलं, की ते या मुद्द्यावर मोहितसोबत चर्चा करतील. न्यायाधीशांनी म्हटलं, की एका मुलीला लग्नाचं आमिष दाखवण्याआधी आणि तिच्यावर बलात्कार करण्याआधी तू विचार करायला पाहिजे होता. तुला माहिती असायला हवं होतं की तू एक सरकारी कर्मचारी आहेस. आम्ही तुझ्यावर लग्नासाठी दबाव आणत नाही. तू तुझी इच्छा काय आहे ते सांग.

आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात म्हटलं, की आधी त्याला त्या मुलीसोबत लग्न करायचं होतं. मात्र, तिनं नकार दिला. आता मी पुन्हा एकदा लग्न नाही करू शकत. कारण माझं आधीच लग्न झालं आहे. मी सरकारी कर्मचारी असून अटक झाल्यास मला निलंबित केलं जाईल. न्यायाधीश म्हणाले, की याच कारणामुळे आम्ही तुला सल्ला दिला. आम्ही तुझ्या अटकेला चार आठवड्यांची स्थगिती देऊ शकतो. याप्रकरणी ट्रायल कोर्टानं आरोपीला अटकेपासून संरक्षण दिलं होतं, मात्र उच्च न्यायालयानं हा निर्णय फेटाळला होता.

First published:

Tags: Crime news, Rape case, Supreme court decision