400 रुपयांसाठी मैत्रीनं घेतलं शत्रुत्व; उल्हासनगरमधील तरुणाला विजेच्या खांबाला डोकं आपटून आपटून मारलं

400 रुपयांसाठी मैत्रीनं घेतलं शत्रुत्व; उल्हासनगरमधील तरुणाला विजेच्या खांबाला डोकं आपटून आपटून मारलं

एकमेकांसाठी जीव देणाऱ्या मित्रांबद्दल ऐकलं असेल, मात्र हा प्रकार धक्कादायक आहे

  • Share this:

ठाणे, 4 फेब्रुवारी : राज्यातील उल्हासनगरमध्ये अवघ्या 400 रुपयांसाठी एका व्यक्तीने आपल्या मित्राची अत्यंत क्रुरपणे हत्या केली. त्याने आपल्या मित्राला खांब्यावर आपटून आपटून मारले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. ज्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही घटना उल्हारनगर हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपीची ओळख सोनू गुप्ता नावाने झाले आहे. त्याच्यावर फहीम शेख नावाच्या तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. फहीम आणि सोनू दोघेही एकाच जीन्स कंपनीत काम करीत होते. काही महिन्यांपूर्वी फहीमने सोनूकडून 400 रुपये उधार घेतले होते. सोनू पैसे मागत होता. आणि फहीम मात्र पगार झाल्यानंतर परत करतो असं म्हणून टाळत होता.

हे ही वाचा-अवघ्या 40 दिवसात डॉक्टर, इंजिनिअर, MBA ची डिग्री; पोलिसही हैराण!

मारहाणीदरम्यान डोकं खांब्याला आपटून आपटून मारलं

उल्हारनगर हिल लाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी सांगितलं की, मंगळवारी दोघांची भेट झाली होती आणि दोघांमध्ये 400 रुपयांवरुन वाद सुरू झाला. हे प्रकरण इतकं वाढलं की दोघं एकमेकांना मारहाण करू लागले. यानंतर सोनूने फहीमचं डोकं विजेच्या खांब्यावर आपटलं. डोक्याला लागल्यानंतर फहीम एक सेकंदासाठी उभा राहिला आणि पुन्हा बेहोश होऊम खाली पडवा. फहीमला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, या प्रकरणात 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सोनूला अटक करण्यात आली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: February 4, 2021, 4:26 PM IST

ताज्या बातम्या