कलकत्ता, 22 जुलै : पश्चिम बंगालच्या कथित एसएससी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज छापेमारी केली. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छापेमारीदरम्यान एजेन्सीने २० कोटींहून अधिक कॅश जप्त केली आहे. ईडीकडून या कॅशचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत.
यापूर्वी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या एका टीमने कथित शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासासाठी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील दोन मंत्री पार्थ चॅटर्जी आणि परेश अधिकारी यांच्या घरावर छापेमारी केली. ईडीचे सात ते आठ अधिकारी सकाळी साधारण ८ वाजता चॅटर्जी यांच्या घरी पोहोचले. आणि ११ वाजेपर्यंत छापेमारी केली. यादरम्यान केंद्रीय रिजर्व पोलीस दलाचे (CRPF) कर्मचारी बाहेर तैनात होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी दुसरी एक टीम कूचबिहार जिल्ह्यातील मेखलीगंजमधील अधिकाऱ्यांच्या घरी पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी शहरातील जादवपूर भागातील पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षा बोर्डाचे माजी अध्यक्ष माणिक भट्टाचार्य यांच्या घरावर छापेमारी केली.
ED is carrying out search operations at various premises linked to recruitment scam in the West Bengal School Service Commission and West Bengal Primary Education Board. pic.twitter.com/i4dP2SAeGG
— ED (@dir_ed) July 22, 2022
सीबीआयने उच्च न्यायालयाच्या निर्देशावर पश्चिम बंगाल स्कूल सेवा आयोगाच्या शिफारसीवर सरकारद्वारा प्रायोजित आणि सहाय्यता प्राप्त शाळांमध्ये समूह सी आणि डी कर्मचारी आणि शिक्षकांची भरती झाली. कथित अनियमिततांचा तपास केला जात आहे. तर ईडी या प्रकरणात संबंधित कथित मनी लॉन्ड्रींगचा तपास करीत आहे.
परेश अधिकारी काय म्हणाले?
जेव्हा कथित घोटाळा झाला तेव्हा काबिल चॅटर्जी त्या वेळी शिक्षण मंत्री होते. आता उद्योग आणि वाणिज्य मंत्री पदावर आहेत. सीबीआयने दोन वेळा त्यांची चौकशी केली आहे. पहिल्यांदा २५ एप्रिल रोजी तर दुसऱ्यांदा १८ मे रोजी चौकशी करण्यात आली होती. या छापेमारीबद्दल माहिती नसल्याचं अधिकारी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, ED, West bengal