Home /News /crime /

सोशल मीडियावरील मैत्रीमुळे तरुणीवर आत्महत्येची वेळ; त्या VIDEO कॉलनंतर आयुष्य उद्ध्वस्त

सोशल मीडियावरील मैत्रीमुळे तरुणीवर आत्महत्येची वेळ; त्या VIDEO कॉलनंतर आयुष्य उद्ध्वस्त

सोशल मीडियावर मैत्री करताना तरुणीकडून एक मोठी चूक झाली आहे.

    लखनऊ, 26 जुलै : लखनऊमधील एका तरुणाच्या प्रेमात पडलेल्या तरुणीने एक मोठी चूक केली आहे. तरुणाने तिला व्हिडीओ कॉल केला आणि न्यूड होण्याची जबरदस्ती केली. जेव्हा तरुणी आपत्तीजनक अवस्थेत आली, तेव्हा तरुणाने स्क्रीन रेकॉर्ड केला. आणि यानंतर तरुणाचा खरा चेहरा समोर आला. तरुण व्हिडीओचं कारण देत तिला ब्लॅकमेल करीत होता. या दोघांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. तरुणीने जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा घरातील सदस्यांना ब्लॅकमेलिंगचा प्रकार कळाला. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली आहे. बेलबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणीची 2020 मध्ये लखनऊ येथील शिवणकाम करणाऱ्या 21 वर्षीय शाबाद याच्याशी ओळख झाली. शाबाद लखनऊपासून 70 किमी दूर राहत आहे. आरोपीने स्वत:विषयीची खरी माहिती न देता तिच्यासोबत मैत्री केली. सुरुवातील ते सोशल मीडियावर चॅट करीत होते. त्यानंतर ते मोबाइलवरुन बोलू लागले.हे ही वाचा-गर्भवती लेकीच्या मृतदेहाचे जमिनीत गाडलेले 12 तुकडे काढून केलं अंत्यसंस्कार व्हिडीओ कॉलवर आपत्तीजनक अवस्थेत.. आरोपी शादाबने काही दिवसांपूर्वी तरुणीला व्हिडीओ कॉल केला होता. त्याने तरुणीला फसवून तिला आपत्तीजनक अवस्थेत येण्यासाठी जबरदस्ती केली. त्यानंतर तरुणाने व्हिडीओ कॉलचा स्क्रीन रेकॉर्ड केला. यानंतर तरुण तिला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करू लागला. पैसे दिले नाही तर व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकीही देऊ लागला. सत्य समोर आल्यानंतर तरुणीने त्याच्याशी संवाद थांबवला. त्यानंतर शादाबने तो व्हिडीओ तरुणीच्या नातेवाईकांना पाठवला. ज्यानंतर घरात मोठा गोंधळ जाला. यानंतरही तो तरुणीला धमकी देत होता. पैसे दिले नाही तर तिच्या प्रोफाइलमधील सर्वांना हा व्हिडीओ शेअर करीन अशी धमकी देत होता. तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न शादाबची सुरू असलेली ब्लॅकमेलिंग आणि तो व्हिडीओ कुटुंबीयांना पाठविल्यानंतर झालेल्या वादामुळे तरुणी निराश झाली होती. 4 दिनसांपूर्वी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळेत कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी एक टीम लखनऊला पाठवली. येथे आरोपीचा IP अड्रेस ट्रॅक करून पोलिसांनी त्याला पकडलं. चौकशीमधून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी 10 वी पास आहे. पुढील शिक्षण घेण्याऐवजी त्याने शिवणकाम सुरू केलं. आरोपीला जबलपूर कोर्टात हजर केल्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Uttar pardesh

    पुढील बातम्या