मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ऑनलाइन क्लास घेणाऱ्या शिक्षकाला अटक; 12 वीच्या विद्यार्थिनीला करायला सांगितलं धक्कादायक कृत्य

ऑनलाइन क्लास घेणाऱ्या शिक्षकाला अटक; 12 वीच्या विद्यार्थिनीला करायला सांगितलं धक्कादायक कृत्य

गेल्या दोन वर्षात ऑनलाइन क्लाससंबंधित अनेक घटना समोर आल्या आहेत.

गेल्या दोन वर्षात ऑनलाइन क्लाससंबंधित अनेक घटना समोर आल्या आहेत.

गेल्या दोन वर्षात ऑनलाइन क्लाससंबंधित अनेक घटना समोर आल्या आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

चेन्नई, 22 नोव्हेंबर : तामिळनाडूच्या (Tamil Nadu News) इरोड जिल्ह्यातील एका खाजगी शाळेतील शिक्षकाला स्थानिक पोलिसांनी POCSO (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण) कायदा, 2012 अंतर्गत अटक केली आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी विद्यार्थी आणि पालकांनी मुख्याध्यापकांच्या अटकेची मागणी (Crime News) करत आंदोलन केलं.

एका खासगी शाळेतील 12 वीच्या विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीनंतर, पोलिसांनी शाळेतील विज्ञान शिक्षकाला अटक केली. त्याने कथित रुपात ऑनलाइन क्लासदरम्यान (Online Class) विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जेव्हा विद्यार्थ्यांची ऑफलाइन शाळा सुरू झाली, त्यानंतर शिक्षक विद्यार्थिनीला त्रास देऊ लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाने तीन विद्यार्थिनींना स्पर्श केला आणि ते चुकीच्या पद्धतीने मुलींशी बोलले. इतकच नाही तर ऑनलाइन क्लासदरम्यान विद्यार्थिनींना डान्स करण्याची जबरदस्ती केली. 49 वर्षीय आरोपी इरोडमधील चिनापुरममधील एका खासगी शाळेत शिकवतात. जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षकाला पोक्सो अंतर्गत अटक केली.

हे ही वाचा-दुर्देवी घटना; मुलाच्या जन्मदिनी केकवरील मेणबत्तीऐवजी आईची चिता जळाली

सोमवारी विद्यार्थी शाळेजवळील एका रस्त्यावर आंदोलनाला बसले. तर कुटुंबीयांनी पोलीस अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. आंदोलनकर्त्यांकडून अटकेची मागणी केली जात होती. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. याशिवाय त्यांची चौकशी केली जात आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला कोयंबतूर जिल्ह्यात 12 वीच्या वर्गातील एका विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलिसांनी या वर्षांच्या सुरुवातीला मार्च आणि मे महिन्यादरम्यान आत्महत्या करण्यासाठी जबाबदार मानत शाळेच्या शिक्षकाला अटक केली होती.

First published:

Tags: Crime news, Online education, School, Tamil nadu