Home /News /crime /

9 महिने कळा सोसून जन्माला घालणाऱ्या आईच्या डोक्यात घातला फावडा, हत्येचं धक्कादायक कारण समोर

9 महिने कळा सोसून जन्माला घालणाऱ्या आईच्या डोक्यात घातला फावडा, हत्येचं धक्कादायक कारण समोर

जन्म देणाऱ्या आईच्याच डोक्यात घातला फावडा, हत्येचं धक्कादायक कारण समोर

    जौनपूर, 24 एप्रिल : कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लोकांना घरातून बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली असतानाही गुन्हे होण्याचं काही थांबत नाही. मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यात एका मुलाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका फावड्याने मारहाण करून वृद्ध आईची हत्या केली. सगळ्यात गंभीर म्हणजे आरोपी मुलाने आईचा मृतदेह घरातच पुरला. पाच दिवसांनंतर, जेव्हा घरात वास येऊ लागला तेव्हा लोकांना त्याबद्दल माहिती झाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. जिथे त्याने चौकशीत आपला गुन्हा कबूल केला आहे. जौनपूर जिल्ह्याच्या नेवध्या पोलीस स्टेशन परिसरातील मधुपूर वृंदावन गावचा रहिवासी आहे. जिथे वृंदावन गावची रहिवासी बगेसरा देवी (वय 70) तिचा लहान मुलगा लालचंद्र पाल यांच्यासमवेत घरात राहत होती. वडील मुलगा फूलचंद आणि त्यांचे कुटुंब मुंबईत राहतात. 'साहेब, भूक लागली आहे खायला द्या, 3 दिवसांपासून पोटात अन्नाचा घास नाही' स्थानिक लोकांनी सांगितले की, 19 एप्रिलपासून बागेसरा देवी बाहेर दिसली नाही. दरम्यान लोकांनी बगेसरा देवीचा शोध घेतला पण ती काही सापडली नाही. 5 दिवसानंतर लालचंद्रच्या घराबाहेर दुर्गंधी पसरली, तेव्हा लोकांना त्याच्या क्रूरपणाबद्दल संशय आला आणि यानंतर गावातील लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पकडल्यानंतर आरोपींनी चौकशीत सांगितले की, 18 एप्रिल रोजी संध्याकाळी त्याने आईला मद्यपान करण्यासाठी पैसे माहितले होते. पण आईने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा त्याने फावडीने तिच्या डोक्यावर वार केले आणि यामुळे तिचा मृत्यू झाला. नंतर त्यांनी मृतदेह घरातच पुरला. USचा खुलासा: कोरोनाच्या उपचारावर 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन'चा फायदा नाही माहिती मिळताच एसपी अशोक कुमार, एएसपी ग्रामीण संजय राय, सीओ माडियाहु विजय सिंह घटनास्थळी दाखल झाले. लालचंद्र यांना ताब्यात घेण्यात आले. एसपी अशोक कुमार यांनी सांगितले की मृत आईचा मुलगा लालदेईच्या तहरीरवर आणि त्याचा भाऊ लालचंद्र याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या 'बारामती पॅटर्न'ला यश, शहर कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या