मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /रेल्वे कर्मचाऱ्यानंच लुटले काउंटरवरचे पैसे, रचलं दरोड्याचं नाटक; असा लागला छडा

रेल्वे कर्मचाऱ्यानंच लुटले काउंटरवरचे पैसे, रचलं दरोड्याचं नाटक; असा लागला छडा

आपण चोरी केल्याचा कुणालाही संशय येऊ नये, यासाठी त्यानं असा काही बनाव रचला की पोलिसांनाही धागेदोरे सापडेनात. मात्र अखेर त्याचं बिंग फुटलंच.

आपण चोरी केल्याचा कुणालाही संशय येऊ नये, यासाठी त्यानं असा काही बनाव रचला की पोलिसांनाही धागेदोरे सापडेनात. मात्र अखेर त्याचं बिंग फुटलंच.

आपण चोरी केल्याचा कुणालाही संशय येऊ नये, यासाठी त्यानं असा काही बनाव रचला की पोलिसांनाही धागेदोरे सापडेनात. मात्र अखेर त्याचं बिंग फुटलंच.

चेन्नई, 4 जानेवारी: ऑनलाईन जुगारात (Online gambling) पैसे (Money) हरल्यामुळे झालेलं कर्ज (Loan) फेडण्यासाठी एका रेल्वे तिकीट खिडकी (Railway ticket window employee) कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच काउंटरवरचे पैसे लुटल्याची (Theft) धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वतःची चोरी लपवण्यासाठी त्यानं दरोडा पडल्याचा बनाव (Drama) रचला आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर त्याचं बिंग पोलिसांनी फोडलंच.

अशी केली चोरी

चेन्नईतील थिरुवनमियुरच्या MRTS तिकीट काउंटरवर प्रवाशांना तिकीटे देण्याचं काम करणाऱ्या टीकाराम नावाच्या तरुणानं स्वतःच्या पत्नीची मदत घेत दरोड्याचा बनाव रचला. या रेल्वे स्टेशनवर तिकीट काउंटर साधारण पहाटे 4 वाजता किंवा त्यापूर्वी उघडण्यात येतं. घटनेच्या दिवशी मात्र 4.30 वाजले तरी तिकीट काउंटर उघडण्यात आलं नव्हतं. त्यामुळे तिकीट काउंटरसमोर प्रवाशांची मोठी रांग लागली होती आणि गोंधळ सुरू झाला होता. प्रवाशांचा गोंधळ ऐकून कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी तिकडे धाव घेतली असता तिकीट काउंटर उघडलं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

पोलिसांना बसला धक्का

नेमकं काय घडलं, हे पाहण्यासाठी पोलीस आतमध्ये गेले असता तिथं तिकीट विक्री कर्मचारी टीकारामचे हातपाय दोरीनं बांधण्यात आल्याचं पोलिसांना दिसलं. त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला होता आणि एका खिडकीला त्याला बांधून घालण्यात आलं होतं. पोलिसांनी त्याची सुटका केली आणि चौकशीसाठी त्याला पोलीस स्टेशनला नेलं.

कर्मचाऱ्याने रचलं नाटक

आपण तिकीट काउंटर उघडण्यासाठी पावणे चारच्या सुमाराला आतमध्ये आलो असता आपल्या मागून तीन दरोडेखोर आले आणि बंदुकीचा धाक दाखवून आपल्या काउंटरला असणारी 1 लाख 32 हजार रुपयांची रक्कम घेऊन पळून गेले. त्यापूर्वी त्यांनी आपल्यावर पिस्तुल रोखलं आणि बांधून घातलं. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आपण काहीच करू शकलो नाही, असं टिकारामनं पोलिसांना सांगितलं.

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र त्या तिकीट काउंटरच्या परिसरात सीसीटीव्ही नसल्यामुळे पोलिसांच्या तपासावर मर्यादा येत होत्या. पोलिसांनी स्निफर डॉगच्या मदतीनंही तपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिकडूनही काही धागेदोरे मिळत नव्हते. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजमधूनही काही लिंक मिळत नव्हत्या. अखेर पोलिसांना टीकारामवरच संशय आला आणि त्यांनी त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

हे वाचा- World Champion न्यूझीलंड आपल्याच जमिनीवर संकटात, बांगलादेश इतिहास घडवण्याजवळ!

पत्नीनं दिली कबुली

पत्नीला पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. आपणच आपल्या पतीला बांधून घातलं आणि पैसे घेऊन पोबारा केल्याची कबुली तिने दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून लुटलेले 1 लाख 32 हजार रुपये त्यांच्याकडून जप्त केले आहेत.

First published:
top videos

    Tags: Chennai, Crime, Police, Railway, Theft