Home /News /crime /

6 वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार आणि हत्या, 4 दिवसांत निर्णय देत 3 दोषींना सुनावली फाशीची शिक्षा

6 वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार आणि हत्या, 4 दिवसांत निर्णय देत 3 दोषींना सुनावली फाशीची शिक्षा

सहा वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने तीन दिवसांत सुनावणी पूर्ण करत 3 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

    दुमका, 03 मार्च : झारखंडमधील रामगढ इथं सहा वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने मंगळवारी दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दुमका पॉक्सो कोर्टात या प्रकरणी सलग तीन दिवस सुनावणी झाली. एवढंच नाही तर सोमवारी रात्री 10.35 पर्यंत न्यायालयाचे काम सुरु होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी निर्णय दिला. न्यायालयाने मोठा निर्णय देताना तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. यामुळे न्याय मिळाल्याची भावना पीडितीचे कुटुंबियांनी व्यक्त केली. गेल्या महिन्यात 5 फेब्रुवारीला 6 वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केला होता. या प्रकरणी 27 फेब्रुवारीला आरोपपत्र दाखल करण्यात आलं. यानंतर सुरु झालेल्या सुनावणीचा निर्णय चार दिवसांत न्यायालयाने दिला. तीनही आरोपींना 28 दिवसांच्या आता दोषींना सुनावण्यात आली. दुमका पॉक्सो कोर्टाने गँगरेप आणि हत्या प्रकरणी तीनही आरोपी मीठू राय, पंकज मोहली आणि अशोक राय यांना अपहरण, गँगरेप आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवलं. पीडितेच्यावतीने दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला. हे वाचा : विकृतीची हद्द! 90 वर्षांच्या महिलेवर केला बलात्कार आणि खून रामगढ इथं 5 फेब्रुवारीला 6 वर्षीय मुलीचे तिच्या नात्यातील एक काका आणि त्याच्या दोन साथीदारांनी अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून हत्या केली होती. त्यानंतर 27 फेब्रुवारीला न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणाच्या सुनावणीने देशात आदर्श घालून दिला आहे. फक्त तीन दिवसात सत्र न्यायालयाने 16 साक्षीदारांच्या साक्षी घेतल्या. सोमवारी सकाळी 11 ते रात्री 10.35 पर्यंत न्यायालयाचे कामकाज सुरू होते. हे वाचा : लग्नात डान्स करत होती 13 वर्षांची मुलगी, चॉकलेटचं आमिष दाखवत केला बलात्कार
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या