Home /News /crime /

अंगावर कोब्रा सोडून पत्नीचा जीव घेणाऱ्याला दुहेरी जन्मठेप, थंड डोक्याने केला होता खून

अंगावर कोब्रा सोडून पत्नीचा जीव घेणाऱ्याला दुहेरी जन्मठेप, थंड डोक्याने केला होता खून

झोपेत असणाऱ्या पत्नीच्या अंगावर विषारी (Duel life term for wife’s murderer) कोब्रा नाग सोडून तिचा जीव घेणाऱ्या निर्दयी पतीला न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

    तिरुवनंतपुरम, 13 ऑक्टोबर : झोपेत असणाऱ्या पत्नीच्या अंगावर विषारी (Duel life term for wife’s murderer) कोब्रा नाग सोडून तिचा जीव घेणाऱ्या निर्दयी पतीला न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचं (Rarest of the rare murder) सांगताना आरोपीच्या वयाकडे बघूनच आम्ही मृत्यूदंड देत नसल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. अत्यंत थंड डोक्यानं आणि हेतुपुरस्सर केलेला हा खून असून माणुसकीला काळीमा फासणारी ही हत्या असल्याचा शेरा न्यायालयाने लगावला आहे. केरळमध्ये घडलेल्या घटनेत पतीने कोब्रा नागाचा वापर करून पत्नीचा खून केला होता. पत्नीच्या हत्येसाठी कोब्रा नागाचा उपयोग करणे, विष देणे, पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करणे आणि हत्या असे गुन्हे 32 वर्षांच्या सूरज नावाच्या आरोपीवर ठेवण्यात आले होते. यापैकी विष देण्याच्या गुन्ह्यासाठी 10 वर्षं आणि पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 7 वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. ही शिक्षा भोगून झाल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुरू होणार आहे. काय आहे प्रकरण? घटना केरळातील कोल्लम येथे घडली असून आरोपी पतीचं नाव सूरज असं आहे. तर उथरा असं मृत पत्नीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीचं मृत उथराशी लग्न झालं होतं. आरोपी सूरजला लग्नामध्ये भरपूर हुंडा देण्यात आला होता. यामध्ये रोख रक्कम, नवीन कार आणि सोन्याचे दागिने यासह अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. असं असूनही आरोपी समाधानी नव्हता. लग्न झाल्यानंतर काही दिवसात त्याने उथराचा हुंड्यासाठी छळ सुरू केला होता. हे वाचा - बापाने पॉर्न दाखवून केली रेपला सुरुवात; बड्या नेत्यांसह 28 जणांकडून नरक यातना दरम्यान, आरोपीनं हुंड्यासाठी अनेकदा पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आहे. तसेच एकदा आरोपीनं मृत महिलेच्या खोलीत कोब्रा साप सोडून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी त्याचा प्लॅन फसला होता. यानंतर त्याने 7 मे 2020 रोजी पत्नी घरात झोपली असताना, दुसऱ्यांदा कोब्रा साप सोडला होता. यादिवशी मात्र उथरा वाचू शकली नाही. कोब्राने दंश केल्यानंतर तिचा  मृत्यू झाला. पण माहेरच्या मंडळींना सूरजवर संशय असल्याने त्यांनी सूरजवर हत्येचा आरोप केला.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Kerala, Murder

    पुढील बातम्या