मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /ही दोस्ती तुटायची नाय! मृत्यूनंतरही नाही सोडली साथ; त्याने मित्राच्या चितेत उडी घेऊन संपवलं आयुष्य

ही दोस्ती तुटायची नाय! मृत्यूनंतरही नाही सोडली साथ; त्याने मित्राच्या चितेत उडी घेऊन संपवलं आयुष्य

मित्राच्या चितेत उडी घेऊन संपवलं आयुष्य

मित्राच्या चितेत उडी घेऊन संपवलं आयुष्य

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मित्राच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं त्याने मित्राच्या चितेत उडी घेऊन आयुष्य संपवलं आहे.

दिल्ली, 28 मे : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. घटना ऐकणाऱ्याच्या डोळ्यात देखील आश्रू तराळावेत अशीच ही घटना आहे. आपल्या मित्राचा मृत्यू झाला आहे, हा धक्का सहन न झाल्यानं दुसऱ्या मित्राने त्याच्या तिचेत उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. हे दोन्ही मित्र प्राथमिक शाळेपासूनच एकत्र शिकले होते. मात्र शनिवारी त्यांच्यामधील एका मित्राचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. मित्राच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं दुसऱ्या मित्राने त्याच्या चितेमध्ये उडी मारत आत्महत्या केली. त्याला जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मित्राची चिता थंड होण्याआधीच त्याचीही प्राणज्योत मालवली.

मित्राच्या निधनाचा धक्का

ही घटना आहे उत्तर प्रदेशातल्या फिरोजाबादमधील. नगला खंगर पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या स्वरूप घाटचा रहिवासी असलेल्या 35 वर्षीय आनंद गौरव याचा मित्र अशोकचं शनिवारी कॅन्सरमुळे निधन झालं. आनंद आणि अशोक तीस वर्षांपासून मित्र होते. मित्राच्या मृत्यूचा मोठा धक्का आनंदला बसला. हा धक्का तो सहन करू शकला नाही. सुरुवातीला तो खूप रडला. चितेजवळ आला, आणि काही कळण्याच्या आतच त्याने चितेत उडी मारली. या घटनेत आनंद 95 टक्के भाजला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे.

कोल्हापुरात पकडलं पाण्यावर तरंगणार 'सोनं', किंमत तब्बल 11 कोटी, काय आहे प्रकार?

उपचारादरम्यान मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद गौरव हा आपल्या मित्राच्या मृत्यूचा धक्का सहन करू शकला नाही. त्याने जळत्या चितेत उडी घेतली. आनंदचा मित्र अशोक याचं दीर्घ आजारानं शनिवारी निधन झालं. त्याला अग्नी दिल्यानंतर सर्व घरी येण्यासाठी निघाले. मात्र आनंद हा त्याच्या चितेजवळच बसून राहिला. खूप रडला. त्यानंतर त्याने जळत्या चितेत उडी मारली. त्याला जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

First published:

Tags: Crime, Crime news, Marathi news