मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आंतरधर्मीय विवाहामुळे गावात राडा, कुटुंबीय एकमेकांच्या जीवावर उठले, दोघांचा मृत्यू

आंतरधर्मीय विवाहामुळे गावात राडा, कुटुंबीय एकमेकांच्या जीवावर उठले, दोघांचा मृत्यू

आंतरधर्मीय विवाहावरुन हिंसक घटना घडल्याचं समोर आलं आहे.

आंतरधर्मीय विवाहावरुन हिंसक घटना घडल्याचं समोर आलं आहे.

आंतरधर्मीय विवाहावरुन हिंसक घटना घडल्याचं समोर आलं आहे.

    बंगळुरू, 11 ऑगस्ट : कर्नाटकातील कोप्पलमध्ये आंतरधर्मीय विवाहावरुन हिंसक घटना घडल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात गुरुवारी एक आतंरधर्मीय लग्न झालं होतं. यावरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला. प्रकरण इतकं वाढलं की, येथे मारहाण सुरू झाली. ज्यात दोघांचा मृत्यू झाला. आंतरधर्मीय विवाहावरुन वाद वाढला... मिळालेल्या माहितीनुसार, मृतांची नावं पशावली मोहम्मद साबा (27) आणि यंकप्पा शामप्पा तलवारा (44) आहेत. दोघेही हुलिहैदर गावाचे निवासी आहेत. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गंगावती शहराजवळील कनकगिरी तालुक्यातील एका गावात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक पशावली मोहम्मद साबाने तलवार समुदायातील एका मुलीसोबत लग्न केलं होतं. यावरुन तलवार समुदायातील लोक नाराज होते. परिणामी गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. गर्लफ्रेंड म्हणाली, तुझ्या सुसाइडची बातमी TV वर दाखव; प्रियकराने केलं मान्य अन्... फूलं तोडायला गेला होता मोहम्मद... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पशावली मोहम्मद साबा त्याच्या घराजवळील फूल तोडण्यासाठी गेला होता. तेव्हाच यंकप्पाने त्याच्यावर हल्ला केला. मोहम्मदसह यंकप्पाचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांच्या दलाला बोलवण्यात आलं आहे. स्थानिक प्रशासनाने येथे 144 कलम लागू केलं आहे. यापुढे काही अघटीत होऊ नये, यासाठी पोलीस अलर्ट आहेत.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Karnataka, Murder

    पुढील बातम्या