मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

DSP चा 'डर्टी पिक्चर'! ४ वेळा संबंध बनवले पण पैसे नाही दिले, कॉलगर्लने चोरला मोबाईल

DSP चा 'डर्टी पिक्चर'! ४ वेळा संबंध बनवले पण पैसे नाही दिले, कॉलगर्लने चोरला मोबाईल

पोलीस अधिकऱ्याचा डर्टी पिक्चर एका मोबाईलमुळे बाहेर आला आणि मोठी खळबळ उडाली.

पोलीस अधिकऱ्याचा डर्टी पिक्चर एका मोबाईलमुळे बाहेर आला आणि मोठी खळबळ उडाली.

पोलीस अधिकऱ्याचा डर्टी पिक्चर एका मोबाईलमुळे बाहेर आला आणि मोठी खळबळ उडाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bihar, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मधेपुरा : पोलीस अधिकऱ्याचा डर्टी पिक्चर एका मोबाईलमुळे बाहेर आला आणि मोठी खळबळ उडाली. या पोलीस अधिकाऱ्याला तरुणी हव्या होत्या. त्यासाठी पैसे देण्याची कबुली देखील त्यांनी दिली. मात्र पैसे काही दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या कॉलगर्ल पुरवणाऱ्या महिलेनं पोलीस अधिकाऱ्याचा फोन चोरला. या फोनसोबत अनेक गुपीतं देखील उघडली. ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बिहारमधील मधेपुरामध्ये कॉल गर्ल सप्लायर महिलेकडून पोलीस विभागाच्या डीएसपीचा मोबाईल जप्त झाल्याची चर्चा संपूर्ण परिसरात आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये कथित महिला दावा केला की ती मधेपुरामधील अनेक पोलिस अधिकाऱ्यांना तरुणी देण्याची सोय करते.

हा व्हिडीओ सहरसा डीआयजी कार्यालयातील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये त्या महिलेनं आणखी धक्कादायक खुलासे केले. तिने एका मुलीला मधेपुरा सदर रुग्णालयासमोरील डीएसपींच्या घरी पाठवलं होतं. तिनेच हा फोन चोरल्याचंही सांगितलं.

प्रत्येक तरुणीचे ३०० रुपये तासाचे ठरलं आणि जास्त वेळ लागला तर ५०० रुपये असं ठरलेलं होतं. पहिल्या वेळी पैसे दिले मात्र त्यानंतर पैसे देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येऊ लागली. त्यामुळे महिलेनं हे पाऊल उचललं आहे.

चार वेळा अधिकाऱ्याने महिलेशी संबंध ठेवले पण त्याचे पैसे काही दिले नाहीत. त्यामुळे त्या रागातून कॉलगर्ल महिलेनं मोबाईल चोरला आहे. मधेपुराचे पोलिस अधीक्षक (एसपी) राजेश कुमार रजेवर गेल्यावर मुख्यालयाचे डीएसपी अमरकांत चौबे यांना एसपीचा पदभार मिळाला.

एसपींनी आपला अधिकृत मोबाइल डीएसपीकडे दिला होता. यादरम्यान एका मुलीला (कॉल गर्ल) डीएसपीने तिच्या घरी बोलावलं. योग्य पैसे न मिळाल्याने तरुणी उशीखाली ठेवलेला मोबाईल घेऊन निघून गेली. दरम्यान, डीआयजींनी एसपींच्या क्रमांकावर फोन केला असता फोन बंद होता. मोबाईलचे लोकेशन समोर आल्यानंतर धक्काच बसला.

First published:

Tags: Bihar, Crime news