Home /News /crime /

दारुडा पती ठरला पत्नीवरील बलात्काराचं कारण; नशा सोडविण्यासाठी महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त!

दारुडा पती ठरला पत्नीवरील बलात्काराचं कारण; नशा सोडविण्यासाठी महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त!

दारू हे अनेक घरांमध्ये वादाचं प्रमुख कारण असल्याचं पाहायला मिळतं.

    इटावा, 30 जानेवारी : सद्यपरिस्थितीत दाम्पत्यांमध्ये विविध कारणांमुळे वाद होत असतात. त्यात दारू हे अनेक घरांमध्ये वादाचं प्रमुख कारण असल्याचं पाहायला मिळतं. मात्र या दारुमुळेच एका व्यक्तीच्या पत्नीवर संकट कोसळलं. पत्नी पतीची दारुची सवय सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होती. दरम्यान त्या प्रयत्नात असताना राँग नंबरच्या माध्यमातून एका अज्ञात व्यक्तीसोबत तिची ओळख झाली. ज्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला इटावा बोलावलं व तिच्यावर बलात्कार (Rape) केला. मिळालेल्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी भजनपुरा येथे राहणारी महिला आपल्या दीराला फोन करीत होती. तेव्हा तिच्या मोबाइलवरुन एक राँग नंबर डाइल झाला. हा क्रमांक इटावा येथे राहणाऱ्या निवृत्त जवानाचा होता. दरम्यान महिला आपल्या पतीच्या दारुच्या व्यसनाबद्दल त्यांच्याशी बातचीत करीत होती. यावर पतीची दारू सोडविण्यासाठी उपाय असल्याचं सांगून निवृत्त जवानाने महिलेला इटावा येथे बोलावलं. ज्यानंतर जवानाने कारमध्ये महिलेवर बलात्कार केला. महिलेची नजर चौकातील पोलिसांकडे गेली असता ती कशीबशी गाडीतून उतरून बाहेर पडली व धावत पोलिसांकडे गेली. तिने पोलिसांनी तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. यानंतर पोलिसांनी महिलेची तक्रार दाखल केली व तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आलं. हे ही वाचा-10 वर्षे आईच्या मृतदेहासोबत एकाच छताखाली राहत होती मुलगी; कारण ऐकून परिसरात खळबळ याबाबत एसपी सिटी यांनी सांगितलं की, बढपुरा पोलीस ठाण्यात 28 जानेवारी रोजी रात्री एका महिलेने निवृत्त जवानाविरोधात तक्रार दाखल केली. पतीचं व्यसन सोडविण्यासाठी मदत करेन असं सांगून त्या व्यक्तीने महिलेला इटावा येथे बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला. याबाबत पोलिसांनी तक्रार दाखल केली असून या प्रकरणात तपास सुरू आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rape, Wife and husband

    पुढील बातम्या