हैदराबाद, 26 एप्रिल : दारुच्या नशेत एका महिलेच्या पतीने (drunked husband) आपल्याच 11 महिन्यांच्या निष्पाप मुलाचा निर्दयपणे खून (baby murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंचेरियल जिल्ह्याच्या मंदामारी गावात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. हा संपूर्ण प्रकार सीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
काय आहे नेमकी घटना?
25 वर्षीय आरोपीचा विवाह 2020 मध्ये 23 वर्षीय तरुणीशी झाला होता. दोघेही सिमेंटच्या विटा बनवण्याच्या कारखान्यात काम करतात. त्यांना 11 महिन्यांचा मुलगा होता. रामकृष्णपूरचे उपनिरीक्षक जी. सुधाकर यांनी TOI ला दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याची पत्नी दोघांना दारू पिण्याची सवय होती. दारूच्या नशेत तो अनेकदा पत्नीला मारहाण करत असे. गेल्या काही महिन्यांपासून तो पत्नीवर संशय घेऊ लागला होता. मारहाण टाळण्यासाठी पत्नी स्वतः कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तीकडे जायची किंवा नातेवाईकाच्या घरी रात्र काढायची.
रविवारी रात्री आरोपी दारू पिऊन घरी आला. पत्नीनेही दारू प्यायली होती. दोघांमध्ये भांडण झाले आणि पतीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर पत्नी आपल्या मुलासह घर सोडून जायला लागली तेव्हा तिचा पती आणखीनच भडकला. त्याने पत्नीच्या हातातून 11 महिन्यांचा मुलगा हिसकावून घेतला आणि सिमेंटच्या विटांवर फेकला. पत्नी मुलाला घेण्यासाठी गेली असता तिने त्याच्यावर लाथा हाणल्या. यानंतर आरोपीने निष्पाप मुलाला हिसकावले आणि जमिनीवर आपटून त्याला गंभीर केले.
घरातील आवाज ऐकून एक महिला तिला वाचवण्यासाठी आली असता आरोपीने तिलाही धक्काबुक्की केली. त्यानंतर आणखी दोन जण आले. त्यांनी आरोपीला पकडले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर महिलेला आणि तिच्या निष्पाप मुलाला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.