Home /News /crime /

दारूच्या नशेत शिक्षक पोहोचला शाळेत, VIDEO VIRAL झाल्यावर झाला निलंबित

दारूच्या नशेत शिक्षक पोहोचला शाळेत, VIDEO VIRAL झाल्यावर झाला निलंबित

शाळा सुरू असताना एक शिक्षक दारू पिऊन आला आणि त्याने जोरदार हंगामा केला. होय, मी दारू प्यायलो आहे, असं म्हणत मग्रुरीदेखील दाखवली.

    रायपूर, 12 डिसेंबर: शाळा सुरु (School) असताना एक शिक्षक (Teacher) दारूच्या नशेत (Liquor) शाळेत आला आणि त्याने जोरदार (Mess) हंगामा केला. लॉकडाऊनच्या काळात (Lockdown) बंद असलेल्या शाळा गेल्या काही महिन्यांपासून सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे झालेलं शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी विद्यार्थी आणि पालक मेहनत करत आहेत. मात्र ज्यांच्या जिवावर हे सगळं करायचं, ते शिक्षकच दारू पिऊन शाळेत येत असतील, तर करायचं तरी काय, असा प्रश्न या घटनेमुळं निर्माण झाला आहे. दारू पिऊन शाळेत छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात एका सरकारी शाळेत स्वतः शिक्षकच दारु पिऊन आला आणि त्याने स्वतः दारू प्यायल्याचे जाहीरपणे ओरडून सांगितलं. होय, मी मोहाची दारू पितो, असं छातीठोकपणे सांगत त्याने इतरांना बेदरकारपणा दाखवण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांपैकी काहीजणांनी त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ व्हायरल होत तो जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचल्यानंतर या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नेहमीच प्यायचा दारू हा शिक्षक शाळेत येताना दरवेळी दारू पिऊन येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. दारूमुळे अनेकदा हा शिक्षक शाळेला गैरहजर राहत असे. जेव्हा तो शाळेत येई, तेव्हा दारूच्या नशेतच असे आणि शाळेत हजेरी लावून तो पुन्हा दारूच्या गुत्त्यावर निघून जात असे. गावातील तरुणी झाली शिक्षिका या शिक्षकाने गावातील एका तरुणीला शाळेतील मुलांना शिकवण्याची जबाबदारी परस्पर सोपवली होती. त्या बदल्यात शिक्षक तरुणीला काही पैसे देत असे. ही मुलगीच दिवसभर शाळेत थांबून शिक्षकाची सर्व कामं पार पाडत होती. या मुलीची पात्रता काय, शिक्षण काय, याची कुणालाच माहिती नाही. हे वाचा- म्हाडा परीक्षेप्रकरणी मोठे मासे गळाला, पुण्यातून तीन आरोपींना अटक धक्कादायक वास्तव छत्तीसगडसारख्या राज्यातील शिक्षण व्यवस्थेचं वास्तवच या प्रकारातून समोर आलं आहे. वर्षानुवर्षं असे प्रकार राजरोसपणे सुरू असताना इतकी वर्ष तो लपून कसा राहिला, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Chattisgarh, School, School teacher

    पुढील बातम्या