पटना, 15 डिसेंबर: दारुड्या व्यक्तीला (drunk suspect) व्यक्तीला पकडून त्याच्यावर कारवाई (Action) करण्यासाठी जो पोलीस अधिकारी (Police officer) गेला, तोच प्रचंड दारू (Drunk) प्यायला असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यावरून जोरदार गदारोळ उडाला. पोलीस अधिकारी कर्तव्यावर असताना शुद्धीत असावा, ही नागरिकांची किमान अपेक्षा असते. सध्या पोलिसांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असले तरी कर्तव्यावर असताना त्यांनी वर्दीत असावं आणि शुद्धीत असावं, अशी अपेक्षा सामान्य माणसं करत असतात. मात्र ड्युटीवर असताना दारु पिऊन नशेच्या धुंदीत असलेला अधिकारी गुन्हेगाराला पकडायला गेल्यामुळे एकच गदारोळ उडाला.
अशी घडली घटना
बिहारच्या गोपालगंज परिसरात एका मेडिकल दुकानात एक दारुडा आला. त्याने दुकानदारासोबत वाद घालायला सुुरुवात केली. काही वेळाने हा वाद विकोपाला गेला आणि दुकानदारानं स्थानिक लोकप्रतिनिधीला तिथं बोलावून घेतलं. लोकप्रतिनिधी आले आणि त्यांनी ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला. याच दरम्यान, त्या रस्त्याने ASI चंद्रमा राम हे गाडीवरून त्या परिसरातून जात होते. गर्दी पाहून त्यांनी गाडी थांबवली आणि गर्दीत घुसून परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र चंद्रमा यांच्याच तोंडाला दारूचा वास येत असल्यामुळे नागरिकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला आणि त्यांना जायला सांगून दुसऱ्या अधिकाऱ्याला पाठवण्यास सांगितलं. मात्र चंद्रमा हे तिथून निघाले आणि थेट संशयित आरोपीच्या घरी पोहोचले.
नीतीश ने बिल्ली को दूध की रखवाली का जिम्मा दिया है! शराब पीकर शराब पकड़ने निकलती है नीतीश कुमार की पुलिस! महिलाओं से बदतमीजी करती है सो अलग! अब नीतीश कुमार कहेंगे कि-"अरे पुरूष पुलिसवाले ने महिला की तलाशी ले ली तो क्या बड़ी बात हो गई? थोड़ी बदतमीजी हो गई तो भूचाल क्यों आ गया? pic.twitter.com/MUCWQ9uBvy
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) December 14, 2021
महिलांची घेतली झडती
नशेच्या धुंदीत आरोपीच्या घरी पोहोचलेल्या अधिकाऱ्यानं आरोपीच्या घरातील महिलांची झडती घ्यायला सुरुवात केली. दारुच्या अंमलाखाली असणारा अधिकारी अशा प्रकारे महिलांनी झडती घेताना पाहून कुटुंबीय संतापले आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ASI चंद्रमा राम यांना अटक केली.
हे वाचा -
नागरिकांचा संताप
या घटनेेमुळे नागरिक आणि व्यापारी संतापले होते. त्यांनी पाच तास दुकानं बंद ठेऊन घटनेचा निषेध केला. त्यानंतर दोन्ही पक्षांची समजूत घालून हे प्रकरण मिटवण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.