'मार मेरे को...' झिंगाट पोलिसाचा हॉटेलमध्ये तुफान राडा, VIDEO व्हायरल

'मार मेरे को...' झिंगाट पोलिसाचा हॉटेलमध्ये तुफान राडा, VIDEO व्हायरल

हा प्रकार सोमवारी दुपारी घडला होता. पण याबाबत अद्यापही कोणताच गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

  • Share this:

मुंबई, 12 जानेवारी : मुंबईत (Mumbai) डोंगरी पोलीस स्टेशन हद्दीत मनोहर हाॅटेलमध्ये  एका पोलिसाने दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात पोलीस कर्मचारी हाॅटेलच्या वेटरला आणि मॅनेजरला शिव्या देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश धुळे असं या पोलिसाचे नाव आहे. अंकुश धुळे हा डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. गेले काही दिवस ते सुट्टीवर होते आणि नुकतेच कामावर रुजू झाले होते. काही व्यक्तीगत कारणास्तव अंकुश धुळे हा तणावग्रस्त होते. सोमवारी नाईट शिफ्ट संपवून ते घरी जात असताना ते मनोहर हाॅटेलमध्ये जेवणासाठी गेले.

दरम्यान, हाॅटेलमध्ये एक वेटर अंकुश याला काही तरी बोलला. त्यामुळे दारुच्या नशेत तर्रर्र असलेल्या अंकुशला राग अनावर झाला आणि त्याने वेटरला जाब विचारला असता दोघांमध्ये बाचाबाची झाली.  हे पाहून हाॅटेलचे इतर वेटर आणि मॅनेजर देखील अंकुश यांच्याशी वाद घालू लागले. तेव्हा मात्र ॲाफ ड्युटीवर असलेल्या अंकुश धुळेचा पारा चढला आणि त्याने सर्वांना शिवीगाळ करायला सुरुवात केली.  हाॅटेलमालकांनी नेमका हाच व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन व्हायरल केला.

हा प्रकार सोमवारी दुपारी घडला होता. पण याबाबत अद्यापही कोणताच गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तर हाॅटेल मालकाने आपली कोणतीच तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे झालेला वादावर दोन्ही बाजूने पडदा टाकण्यात आला.

Published by: sachin Salve
First published: January 12, 2021, 5:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading