नवी दिल्ली, 29 मार्च: देशाची राजधानी दिल्लीत काल मध्यरात्री दोन गटात तुफान राडा झाला आहे. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना चांगलाचं चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल (Viral Video) होतं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होतं असताना असा दावा केला जात आहे की, संबंधित मार खाणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Drunk Ajay Devgan beaten up) आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, ज्यावेळी घटना घडली तेव्हा अभिनेता अजय देवगण दारुच्या नशेत होता. कार पार्किंगच्या जागेवरून त्याची एका व्यक्तीसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर या वादाच रुपांतार टोळी युद्धात झालं आहे. असं असलं तरी व्हिडीओ अस्पष्ट असून यामध्ये भांडण करणाऱ्या व्यक्तींचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. पण ज्या व्यक्तीला मारहाण होतं आहे, त्या व्यक्तीची पर्सनालिटी अभिनेता अजय देवगणशी मिळती जुळती आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संभ्रम तयार झाला आहे.
एका ट्विटर वापरकर्त्यानं या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पांढरा शर्ट परिधान केलेल्या एका व्यक्तीला मारहाण केली जात आहे. संबंधित व्हिडीओ पोस्ट करताना या वापरकर्त्यानं लिहिलं की - 'तो अजय देवगण आहे की नाही हे मला माहिती नाही. पण शेतकरी आंदोलनाबाबत लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मार खाणारी व्यक्ती अजय देवगण आहे असा दावा केला जात आहे.'
Not really sure if this is #ajaydevgan or not but #Kisanektamorcha agitation seems to be spreading up. Social media floating with this video that drunk @ajaydevgn got beaten up?? #RakeshTikait pic.twitter.com/Fv8j0kG5fv
— lalit kumar (@lalitkumartweet) March 28, 2021
हे ही वाचा - 'शेतकरी आंदोलनासाठी ट्वीट का केलं नाही?' जाब विचारत अभिनेता अजय देवगणची गाडी रस्त्यात रोखली
तथापि, या व्हिडीओची पडताळणी केली असता, हा व्हिडीओ राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एअरोसिटी येथील आहे. काल रात्री कार पार्किंगवरून दोन गटात झगडा झाला आहे. या भांडणात बरीच लोकं सामील होते. त्यांनी एका व्यक्तीला पकडून त्याला चांगलीच मारहाण केली आहे. पण या घटनेचा अजय देवगणशी काही संबंध नसल्याचं आमच्या पडताळणीत समोर आलं आहे. या घटनेनंतर मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajay devgan, Viral video.