कलकत्ता, 3 एप्रिल : देशात ड्रगचा (Drugs) अवैध व्यवसाय थांबवण्याचं नाव घेत नाही. अडानी एअरपोर्टसह देशाच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमामात हेरोइन सापडल्याचं प्रकरण अद्यापही सुरू असताना डिआरआयने कलकत्ता एअरपोर्टवर 113 कोटींची हेरोइन जप्त केली आहे. डीआरआयने हेरोईन आणि दोन महिलांसह तीन आफ्रिकन नागरिकांना अटक केलं आहे. तब्बल 16.15 किलो हेरोईन जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. केनियाई पुरुष आणि दोन महिलांची चौकशी केली जात आहे.
कलकत्ता विमानतळावरील महसूल गुप्तचर संचालनालयाला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार, येथून ड्रग्जची मोठी खेप मिळाली. अद्याप या प्रकरणात कोणतीही महत्त्वाची माहिती हाती लागू शकलेली नाही. मात्र या लीडमुळे डीआरआय सक्रिय झाले आहेत.
एअरपोर्टवर संशयास्पदांचा शोध सुरू..
डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ड्रगची मोठी खेप पकडण्यासाठी संपूर्ण टीमने जाळं रचलं होतं. 30 मार्च रोजी फ्लाइट आल्यानंतर तपास सुरू झाला. एक एक व्यक्ती आणि त्यांच्या सामानांचा तपास सुरू केला. तपासादरम्यान एका ट्रॉली बॅगमध्ये काही संशयास्पद वस्तू आढळल्या. तीन ते चार ट्रॉली बॅगेच्या तपासात एका पावडर सापडली. नीट तपास केल्यानंतर 14 समसमान पॅकेट सापडले. तज्ज्ञांनी परीक्षण केल्यानंतर या पॅकेटमध्ये हेरोईन असल्याचं समोर आलं.
हे ही वाचा-100 कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रांचीतून अटक, असा लावला ठगाचा शोध
बॅगेच्या मालकांना केली अटक...
हेरोईन ज्यांच्या सामानातून पकडण्यात आली, त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत तीन आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. पुरुष केनियातील राहणारा आहे. अटक केलेल्या तीन पैकी दोन प्रवासी मेडिकल व्हिजावर आले होते, तर एक व्यावसायिका व्हिजावर भारतात आला होता. अटकेनंतर तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Drugs, Kolkata