मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुंबईत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; 75 वर्षाच्या महिलेच्या झोपडीतून सव्वा कोटीचं चरस जप्त

मुंबईत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; 75 वर्षाच्या महिलेच्या झोपडीतून सव्वा कोटीचं चरस जप्त

Drug racket exposed in Mumbai: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं वांद्रे परिसरातील चिंचवडी भागात सापाळा रचून एका ड्रग्ज रॅकेटचा (Drugs Racket) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या झोपडीतून तब्बल 3 किलो 960 ग्रॅम वजनाचं चरस जप्त (3 kg 960 gm drugs seized) केलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 मे: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं वांद्रे परिसरातील चिंचवडी भागात सापाळा रचून एका ड्रग्ज रॅकेटचा (Drugs Racket) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका 75 वर्षीय वृद्ध महिलेला अटक (75 years old woman arrest) केली आहे. यावेळी पोलिसांनी तिच्या झोपडीतून तब्बल 3 किलो 960 ग्रॅम वजनाचं चरस जप्त (3 kg 960 gm drugs seized) केलं आहे. याची बाजारातील किंमत तब्बल सव्वा कोटी रुपये इतकी आहे. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने केली असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास केला जात आहे.

संबंधित अटक केलेल्या 75 वर्षीय वृद्ध महिलेचं नाव जोहराबीन अकबर अली शेख असं असून ती आपल्या झोपडी शेजारी राहणाऱ्या 57 वर्षीय किशोर गवळी याच्या मदतीनं ड्रग्ज रॅकेट चालवत होती. या ड्रग्ज रॅकेटची माहिती मिळाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने वांद्रे पश्चिमेकडील चिंचवडी भागात सापळा रचून किशोर गवळी याला अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडे 7 तोळे चरस आढळला आहे.

हे ही वाचा-गुजरातला जाणाऱ्या गाडीतून कोट्यवधींची रक्कम जप्त; सकाळी नोटा मोजायला सुरुवात केल

याप्रकरणी आरोपी किशोर गवळी याची चौकशी करत असताना, तो हा माल चिंचवडी भागात घराशेजारी राहणाऱ्या वृद्ध महिलेकडून घेत असल्याचं सांगितलं. यानुसार गुन्हे शाखा युनिट 7 चे प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर आणि त्यांच्या पोलीस पथकानं संबंधित वृद्ध महिलेच्या घरी शनिवारी रात्री छापा टाकला. यावेळी वृद्ध महिलेच्या झोपडीत तब्बल 3 किलो 800 ग्रॅम चरस आढळला आहे. हा सर्व चरस पोलिसांनी जप्त केला असून रविवारी वृद्धेला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Drugs, Mumbai