मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नशेचा बळी! आठवीचा विद्यार्थी झाला कर्जबाजारी, निराशेतून संपवलं जीवन

नशेचा बळी! आठवीचा विद्यार्थी झाला कर्जबाजारी, निराशेतून संपवलं जीवन

नशेमुळे कर्जाचा डोंगर (Drug addict student commits suicide after getting trapped in big loan) उभ्या केलेल्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नशेमुळे कर्जाचा डोंगर (Drug addict student commits suicide after getting trapped in big loan) उभ्या केलेल्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नशेमुळे कर्जाचा डोंगर (Drug addict student commits suicide after getting trapped in big loan) उभ्या केलेल्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुजफ्फरपूर, 12 नोव्हेंबर: नशेमुळे कर्जाचा डोंगर (Drug addict student commits suicide after getting trapped in big loan) उभ्या केलेल्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळकरी वयातच (Addicted in school age) या मुलाला अनेक व्यसनं जडली होती. त्यासाठी त्याने अऩेकांकडून पैसे उभे करत कर्जाचा डोंगर केला होता. नशेतून येणारं नैराश्य आणि कर्जाचं डोंगर यामुळे (Student commit suicide) आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं स्वतःचं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

लहान वयात नशेबाजी

बिहारच्या मुजफ्फरपूर भागात राहणाऱ्या आदित्य कुमार या 16 वर्षांच्या तरुणानं गळफास लावून आत्महत्या केली. गेल्या काही महिन्यांपासून त्याला पावडर हुंगण्याचं व्यसन लागलं होतं. काही मित्रांच्या साथीनं तो ही नशा करत असे. हा विद्यार्थी त्याच्या मावशीकडे शिक्षणासाठी राहिला होता. आठवीत शिकणाऱ्या आदित्यला अंमली पदार्थांचं व्यसन जडलं होतं. त्यासाठी तो त्याच्या मित्रांकडून पैसे उधार घेत असे. आतापर्यंत त्याने अनेकदा असे पैसे उधार घेतले होते आणि मोठं कर्ज केलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

घरच्यांच्या प्रयत्नांना अपयश

आदित्यचं व्यसन सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याचं त्याच्या मावशीनं सांगितलं. बंगळुरूतील एका व्यसनमुक्ती केंद्रावरही त्याला नेण्यात आलं होतं. तिथं त्याचं काऊन्सिलिंग करण्यात आलं होतं. मात्र त्याचा काहीच परिणाम त्याच्यावर झाल्याचं दिसलं नाही. त्याची नशाबाजी सुरूच होती.

गळफास घेऊन आत्महत्या

घटनेच्या दिवशी त्याने वीजेच्या वायरने गळफास घेतला. रात्री जेवण न करताच त्याच्या खोलीत झोपायला गेलेला आदित्य सकाळी बराच वेळ खोलीतून बाहेर आला नाही. त्यामुळे मावशीनं त्याला हाका मारायला सुरुवात केली. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्यामुळे तिने खिडकीचा पडदा बाजूला करून आत पाहिलं. तेव्हा तार गळ्याभोवती गुंडाळून पंख्याला लटकलेला मृतदेह तिला दिसला. तिने आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबीय आणि शेजारी एकत्र आले आणि दरवाजा तोडून आदित्यचा मृतदेह खाली उतरवण्यात आला.

हे वाचा- बीड हादरलं, एकाच दिवशी दोन 16 वर्षीय मुलींची आत्महत्या

पोलीस तपास सुरू

प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यामागे अजून काही धागेदोरे आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Drugs, Police, Suicide case