मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ड्रग्जच्या नशेत पतीनं केली पत्नीची हत्या, गळ्यात दोर बांधून आत्महत्या केल्याचा कांगावा

ड्रग्जच्या नशेत पतीनं केली पत्नीची हत्या, गळ्यात दोर बांधून आत्महत्या केल्याचा कांगावा

अंमली पदार्थांची (Drugs) नशा करणाऱ्या पतीनं (Husband) हुंड्यासाठी (Dowry) आपल्या पत्नीची (Wife) हत्या (Murder) करून तिचा मृतदेह (Dead Body) दोराला टांगला

अंमली पदार्थांची (Drugs) नशा करणाऱ्या पतीनं (Husband) हुंड्यासाठी (Dowry) आपल्या पत्नीची (Wife) हत्या (Murder) करून तिचा मृतदेह (Dead Body) दोराला टांगला

अंमली पदार्थांची (Drugs) नशा करणाऱ्या पतीनं (Husband) हुंड्यासाठी (Dowry) आपल्या पत्नीची (Wife) हत्या (Murder) करून तिचा मृतदेह (Dead Body) दोराला टांगला

  • Published by:  desk news

पटना, 14 सप्टेंबर : अंमली पदार्थांची (Drugs) नशा करणाऱ्या पतीनं (Husband) हुंड्यासाठी (Dowry) आपल्या पत्नीची (Wife) हत्या (Murder) करून तिचा मृतदेह (Dead Body) दोराला टांगला. पत्नीनं आत्महत्या केल्याचा बनाव रचत त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर सत्य बाहेर आलंच.

नशेमुळे झाला उद्ध्वस्त

बिहारच्या गोपालगंजमध्ये राहणाऱ्या राजीव रंजन पाठकचं लग्न 2018 साली बबली पाठकशी झालं होतं. त्यावेळीदेखील राजीवला ड्रग्जचं व्यसन होतं. मात्र त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी ही बाब बबली आणि तिच्या कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती. त्यामुळे लग्नानंतर बबली आणि राजीवमध्ये जोरदार भांडणं होत असत. त्यातच राजीव आणि त्याच्या कुटुंबीयांनी बबलीकडे हुंड्यासाठी तगादा लावला होता. तिने माहेरहून पैसे आणावेत, यासाठी तिला सतत मारहाण कऱण्यात येत असे.

व्यसनापायी संसाराची बरबादी

आपल्या ड्रग्जच्या व्यसनासाठी राजीवने घरातील पत्नीचे आणि इतर सर्व दागिने विकून टाकले. पत्नीकडे असणारे पैसेदेखील त्याने संपवले होते. पत्नीला माहेरहून पैसे आणण्यासाठी तो सतत तगादा लावत असे. बबलीचे सासरेदेखील हुंड्यासाठी तिचा छळ करत असल्याची माहिती बबलीच्या भावानं दिली आहे.

खून करून आत्महत्येचा बनाव

हुंड्याच्या मुद्द्यावरून झालेल्या जोरदार वादानंतर राजीव आणि त्याच्या कुटुंबीयांनी बबलीला जोरदार मारहाण केली. यात काही वार जिव्हारी लागल्यामुळे बबलीचा मृत्यू झाला. त्यानंतर आपल्यावर खुनाचा आळ येऊ नये, यासाठी त्यांनी बबलीचा मृतदेह दोरीने बांधला आणि छतावर लटकवला. बबलीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव कुटुंबीयांनी रचला.

हे वाचा -उपचारासाठी गेलेल्या महिलेचा डॉक्टरने केला विनयभंग, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पोलिसांत तक्रार

पोलिसांत राजीवने तक्रार नोंदवत बबलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले. सुरुवातीला पोलिसांनाह आत्महत्येच्या थिअरीवर विश्वास बसला होता. मात्र बबलीचे वडील आणि भावाने तिचा हुंड्यापायी छळ होत असल्याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेपूर्वी काही वेळ बबली तिच्या बहिणीशी फोनवर बोलत असल्याचंही पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी पती राजीवला अटक केली असून त्याच्यासह कुटुंबीयांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Murder, Wife