मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

हजारांच्या बदल्यात 3 कोटींचं नुकसान; मुंबईतील कर्मचाऱ्याने असा उगवला मालकावर सूड

हजारांच्या बदल्यात 3 कोटींचं नुकसान; मुंबईतील कर्मचाऱ्याने असा उगवला मालकावर सूड

या प्रकारात मालकाचं तब्बल तीन कोटींच नुकसान झालं आहे.

या प्रकारात मालकाचं तब्बल तीन कोटींच नुकसान झालं आहे.

या प्रकारात मालकाचं तब्बल तीन कोटींच नुकसान झालं आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 24 जानेवारी: मुंबईतील एका ट्रॅव्हल एजन्सीकडे ड्रायव्हरचं काम करणाऱ्या व्यक्तीने एजन्सीच्या मालकीच्या बसगाड्यांना आगीच्या हवाली केलं. या घटनेत ट्रॅव्हल एजन्सीच्या पाच गाड्या जळून खाक झाल्या आहेत. मालकाने कामाचे पैसे न दिल्याने बदला घेण्यासाठी संबंधित आरोपी ड्रायव्हरने या बसगाड्या जाळल्याची माहिती समोर आली आहे. या जळीतकांडात बस मालकाचं तब्बल तीन कोटींच नुकसान झालं आहे. मुबंई पोलिसांनी शनिवारी आरोपी ड्रायव्हरला अटक केली आहे. या घटनेतील आरोपीचं नाव अजय सारस्वत असं असून तो 24 वर्षांचा आहे. कोरोना साथीच्या काळात आरोपीनं मुंबईतील आत्माराम ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ड्रायव्हर म्हणून दहा दिवस काम केलं होतं. त्याने गेल्या एका महिन्याच्या काळात आत्माराम ट्रॅव्हल एजन्सीच्या पाच बसगाड्या आगीच्या हवाली केल्या आहेत. 24 डिसेंबर 2020  रोजी आरोपीनं तीन बसगाड्या जाळल्या होत्या, तर 21 जानेवारी 2021 रोजी दोन बसगाड्या जाळल्या होत्या. केवळ आत्माराम ट्रॅव्हल एजन्सीच्या गाड्यांनाच आग का लागते? यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर संबंधित प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्माराम ट्रॅव्हल एजन्सीच्या काही बसेसच्या बॅटऱ्या खराब झाल्या होत्या. त्यामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज नोंदवला होता. परंतु एका महिन्यानंतर घटनेची पुनरावृत्ती झाल्याने पोलिसांना या घटनेबाबत संशय आला. तसेच ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकाने आपल्या एका ड्रायव्हरवर संशय असल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली आहे. हे ही वाचा-वारंवार केलं जात होतं घृणास्पद कृत्य, 10 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या या प्रकरणी ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकाने सांगितलं की, कोरोना साथीच्या काळात काम करण्यासाठी ट्रॅव्हल एजन्सीला काही ड्रायव्हरची आवश्यकता होती. त्यावेळी आरोपी अजय सारस्वतने या एजन्सीत केवळ दहा दिवस काम केलं होतं. त्यावेळी बस चालवत असताना आरोपी अजयने गोव्यात एक अपघात केला होता. ज्यामध्ये ट्रॅव्हल एजन्सीच्या बसचं प्रचंड नुकसान झालं होतं, त्यामुळे मालकाने आरोपी अजयचे कामाचे पैसे कापून घेतले होते. त्यामुळे मालकाचा बदला घेण्यासाठी आरोपी अजयने एजन्सीच्या पाच बसगाड्या जाळून टाकल्या. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता, आरोपी अजयने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
First published:

Tags: Crime news, Mumbai

पुढील बातम्या