4 कोटींसह चालकाने एटीएम व्हॅन पळवली, विरारमधील धक्कादायक घटना

कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गाडीतून मॅनेजर आणि बॉडीगार्ड खाली उतरले. दोघेही जण खाली उतरल्याची संधी साधून चालकाने व्हॅन सुसाट पळवली.

कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गाडीतून मॅनेजर आणि बॉडीगार्ड खाली उतरले. दोघेही जण खाली उतरल्याची संधी साधून चालकाने व्हॅन सुसाट पळवली.

  • Share this:
विरार, 13 नोव्हेंबर : मुंबई (Mumbai )जवळील विरारमध्ये बोळींज (virar bolinj) भागात एटीएममध्ये (ATM Van) पैसे भरण्यासाठी आलेली गाडी चालकानेच पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या व्हॅनमध्ये तब्बल 4 ते सव्वा चार कोटी रुपये असल्याचे कळतंय. त्यामुळे या घटनेमुळे विरारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विरार पश्चिमेकडील बोळींज भागात गुरुवारी संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बोळींज भागात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेत नेहमी प्रमाणे पैसे भरण्यासाठी व्हॅन आली होती. Googleवर डेटा सेव्ह करण्यासाठी मोजावे लागणार पैसे; वाचा काय आहे नवी पॉलिसी कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गाडीतून मॅनेजर आणि बॉडीगार्ड खाली उतरले. दोघेही जण खाली उतरल्याची संधी साधून चालकाने व्हॅन सुसाट पळवली. बॉडीगार्ड आणि मॅनेजरने जोरात आरडाओरडा केला. पण, चालकाने वेगाने निघून गेला. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल मॅनेजरने आपल्या बँक व्यवस्थपकाला याची माहिती दिली. बँकेनं तातडीने याबद्दल विरार पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने मुंबई अहमदाबाद महामार्गावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर   नाकाबंदी केली आहे. VIDEO पालघरच्या आदिवासी महिलांच्या बांबूच्या आकाश कंदिलांनी उजळलं राजभवन 'गुरुवारी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कोटक महिंद्राच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी ही व्हॅन आली होती. त्यावेळी चालकाने व्हॅन पळवून नेण्याचा प्रकार घडला. व्हॅनमध्ये किती रक्कम होती, याबद्दल अद्याप बँकेकडून माहिती देण्यात आली नाही.  पण हा दरोड्याचा प्रकार नसून चोरीची घटना आहे. या व्हॅनच्या शोधासाठी तीन पथक तयार करण्यात आले आहे. कसून तपास सुरू आहे, अशी माहिती  पोलीस उपायुक्त  संजयकुमार पाटील यांनी दिली. दरम्यान, पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार ते सव्वा चार करोड रुपये हे गाडीत असून ती ड्रायव्हरने पळवल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून व्हॅनचा शोध घेत आहे.
Published by:sachin Salve
First published: