मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

महिलेच्या जखमेवर कंडोमच्या रिकाम्या पाकिटाचं ड्रेसिंग, रुग्णालयातील संतापजनक घटना

महिलेच्या जखमेवर कंडोमच्या रिकाम्या पाकिटाचं ड्रेसिंग, रुग्णालयातील संतापजनक घटना

एका रुग्णालयातील हा प्रकार संताप वाढवणारा आहे,

एका रुग्णालयातील हा प्रकार संताप वाढवणारा आहे,

एका रुग्णालयातील हा प्रकार संताप वाढवणारा आहे,

  • Published by:  Meenal Gangurde

भोपाळ, 20 ऑगस्ट : मध्यप्रदेशातील आरोग्य सुविधेची परिस्थिती गंभीर असल्याचं समोर आलं आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. येथील वैद्यकीय सेवेत निष्काळजीपणा केल्याचं समोर आलं आहे. एका महिलेसोबत रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी अमानवीय व्यवहार केला. या कृत्यामुळे महिलेच्या शरीरावर संसर्ग पसरण्याची भीती वाढली. यात तिचा जीवही जाऊ शकला असता.

पोरसामधील धर्मगढ गावातील 70 वर्षीय महिला घरात झोपली होती. यादरम्यान छतावरुन एक वीट खाली पडली. ती रेशमा यांच्या डोक्यावर पडली. यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. यानंतर महिलेला पोरसा रुग्णालयात नेण्यात आलं. येथे डोक्यातून येणारा रक्तस्त्राव रोखण्यासाठी डॉक्टरने कंडोमचं रिकामं पॅकेट त्यांच्या जखमेच्या जागी लावलं. यानंतर पट्टी बांधून महिलेला मुरैना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं. पोरसा रुग्णालयात पट्टी, कापूस याऐवजी कंडोमचं रिकामं पॅकेट जखमेवर बांधण्यात आलं. या घटनेनंतर येथे मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांवर सवाल उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या डोक्यावरील जखमेवर कापसाऐवजी कंडोमचं रिकामं पॅकेट लावण्यात आलं. अशा पद्धतीने महिलेच्या जखमेवर ड्रेसिंग करण्यात आली. मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांना याबाबत माहिती नव्हती. याबाबत तपास केला जात असून चौकशीसाठी एका समितीचं गठण करण्यात येईल.

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh