Home /News /crime /

पती आणि मुलांना रात्री संपवलं, सकाळी फुलं वाहिली आणि...,डॉक्टर सुषमा राणेनं असं का केलं?

पती आणि मुलांना रात्री संपवलं, सकाळी फुलं वाहिली आणि...,डॉक्टर सुषमा राणेनं असं का केलं?

सुषमा राणे यांनी आत्महत्येआधी पती प्रा. धीरज राणे आणि दोन मुलांना हायडोज इंजेक्शन दिले होते.

    नागपूर, 20 ऑगस्ट : नागपूरमध्ये डॉक्टर सुषमा राणे हीने आपल्या पती आणि दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केली होती. या प्रकरणी आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुषमा राणे यांनी आत्महत्येआधी  पती  प्रा. धीरज राणे आणि दोन मुलांना हायडोज इंजेक्शन दिले होते. दोघांचाही मृत्यू झाल्यानंतर राणे यांनी तिघांच्या मृतदेहावर श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर राणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुषमा राणे हीने आपला पती धीरज आणि मुले ध्रुव आणि लावण्यांची हत्या करण्यासाठी आठवड्याभरापासून प्लॅनिंग केले होते. यासाठी तिने रुग्णालयातूनच ॲनेस्थेसियाचे इंजेक्शन आणि झोपेच्या गोळ्या आपल्या सोबत आणल्या होत्या. आत्महत्येपूर्वी धीरज आणि सुषमा यांच्यात सोमवारी कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर सुषमाने कुटुंबाला संपवण्याचे मनाशी पक्क केले होते. रात्री घरी मुलांना जेवणातून झोपेच्या गोळ्या तर पती धीरजला चहातून  झोपेच्या गोळ्या दिल्या. झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे तिघेही जण गाढ झोपेत गेले होते. त्यानंतर सुषमाने तिघांना ॲनेस्थेसियाचे हायडोज इंजेक्शन दिले. इंजेक्शन दिल्यानंतर तिघांचाही मृत्यू झाला याची तिने खात्री केली. आपल्या हातून काय घडले याचे जाणीव नंतर सुषमा झाली. त्यामुळे रात्रभर ती तिघांच्या मृतेदहाशेजारी बसून होती. सकाळी उठल्यावर ती स्कुटी घेऊन बाहेर गेली आणि फुलं आणली. तिघांनाही तिने फुलं वाहिली आणि ओढणीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. सुषमाने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. यात तिने पती धीरज हा खूप खचला आहे. त्याचीही अवस्था पाहू शकत नाही, त्यामुळे असा निर्णय घेत आहे, असं सुसाईट नोटमध्ये सुषमाने लिहिलं आहे. मंगळवारी राणे कुटुंबात काय घडलं? राणे कुटुंबीय हे कोराडी रोड ओमनगर परीसरात राहत होते. धीरज राणे हे प्राध्यापक , तर पत्नी सुषमा राणे या डॉक्टर होत्या. 11 वर्षीय मुलगा ध्रुव आणि 5 वर्षाची मुलगी लावण्या यांचाही यात समावेश आहे. धीरज राणे आणि त्यांची पत्नी  सकाळी उशिरापर्यंत उठले नाही म्हणून त्यांच्या आईने आवाज दिले. त्यावेळी त्या धीरज यांची पत्नी सुषमा त्यांच्याशी बोलल्या. पोळ्याची सुटी असल्याने त्यांना झोपू द्या, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास सुषमा यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्यांच्याकडे एक सुसाईड नोट आढळली आहे. सुषमा राणे डॉक्टर होत्या तर धीरज नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. धीरज आणि त्यांच्या मुलांचा मृतदेह हा बेडवर आढळून आल्याचीही माहिती आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या