शेकडो कळ्यांचा जीव घेणाऱ्या डॉ.सुदाम मुंडेला पुन्हा बेड्या, असं थाटलं होतं दुकान!

शेकडो कळ्यांचा जीव घेणाऱ्या डॉ.सुदाम मुंडेला पुन्हा बेड्या, असं थाटलं होतं दुकान!

2012 साली अवैध गर्भपात प्रकरणी बीड जिल्हा न्यायालयाने सुदाम मुंडेला पत्नी सरस्वतीसह दोषी ठरवून दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

  • Share this:

बीड, 06 सप्टेंबर : स्त्री भ्रूण हत्येचा काळा डाग बीडच्या माथी मारणाऱ्या क्रूरकर्मा डॉ.सुदाम मुंडेचा आणखी एक काळा प्रताप समोर आला आहे. परळी शहराजवळ बेकायदेशीर हॉस्पिटल सुरू करून गर्भपात आणि कोरोना प्रॅक्टिस करत असल्याच्या तक्रारीवरून सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलवर बीड जिल्हा प्रशासन मोठी कारवाई केली. तब्बल सात तास झाडाझडती घेतली यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावेळी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुंडेने अरेरावीची भाषा करत मुजोरी केल्याचेही समोर आले.

देशभरात गाजलेल्या अवैध गर्भपाताच्या गुन्ह्यात जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या डॉ. सुदाम मुंडे याने बेकायदेशीरपणे हॉस्पिटल सुरू करत स्वतः प्रॅक्टिस करत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे मिळाल्या नंतर  सापळा रचून आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री मुंडे च्या बेकायदेशीर हॉस्पिटलवर छापा मारला. यावेळी गर्भपात आणि कोरोना संशयास्पद साहित्य आणि औषधी सापडले. तसंच या दवाखान्यात कोरोना संशयित रुग्णांवर देखील उपचार सुरू होता अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिली.

शरद पवारांच्या गाडीचं स्टिअरिंग आणखी एका नातवाच्या हाती... पाहा VIDEO

सुदाम मुंडे यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द केलेले असून हे रुग्णालय बेकायदेशीर सुरू होते. याला कुठलीही परवानगी नव्हती असेही जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितलं.

बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने जिल्हा आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करत सुदाम मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपाताचे संशयास्पद औषधी आणि साहित्य जप्त केले आहे. तसंच  कारवाईसाठी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी देत अरेरावीची भाषा केल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात परळी शहर पोलीस ठाण्यात सुदाम मुंडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंडेला अटक केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

कारवाई करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी देत अरेरावीची भाषा करत कारवाईत अडथळा आणल्या प्रकरणी सुदाम मुंडे 353 कलम लावण्यात आले आहे, असं हर्ष पोतदार यांनी सांगितले.

हात सॅनिटाइझ करून पेटवली मेणबत्ती अन् झाला स्फोट, नेमकं काय घडलं वाचा

सुदाम मुंडे सारख्या क्रूरकर्मा डॉक्टर शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा प्रॅक्टिस करणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. जिल्हा प्रशासनाने केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र, या प्रकरणात सुदाम मुंडे यांच्या मुलीच्या नावाने सुरू असलेल्या हॉस्पिटलमध्ये मुंडेही प्रॅक्टिस करत होता. तेव्हा आरोपीला मदत करणाऱ्या सोना सुदाम मुंडेच्या मुलीवर देखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महिला सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांनी केली आहे.

सुदाम मुंडे हा वैद्यकीय क्षेत्रातील कलंक असून त्यामुळे बीड जिल्ह्याची मोठी बदनामी झाली आहे. शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा त्याने प्रॅक्टिस करणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे याबाबतीत आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो तसंच मुंडेवर कठोरात कठोर कारवाई करून पुन्हा त्याला प्रॅक्टिस करता येऊ नये व जिल्ह्यामध्ये प्रॅक्टिस करू देऊ नये, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे बीड जिल्हा अध्यक्ष डॉ.अनिल बारकुल यांनी केली.

काय आहे प्रकरण?

2012 साली अवैध गर्भपात प्रकरणी बीड जिल्हा न्यायालयाने सुदाम मुंडेला पत्नी सरस्वतीसह दोषी ठरवून दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. परंतु, ही शिक्षा भोगत असताना काही महिन्यापूर्वी त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने परळी जवळ बेकायदेशीरपणे दवाखाना सुरू केला. हजारो कोवळ्या कळ्यांना गर्भात खुढणाऱ्या सुदाम मुंडे सारख्या प्रवर्ती पुन्हा समाजामध्ये डोकं वर काढत आहेत. त्यांच्यावर शासन-प्रशासन आणि समाजव्यवस्थेने लक्ष ठेवून दक्ष राहणे गरजेचे आहे अन्यथा पुन्हा एकदा हजारो कळ्या खुडल्या जातील हा धोका अंगावर शहारे आणणारे आहे.

सुदाम मुंडेचे काळे कृत्य

परळीतील उच्चशिक्षित असलेले सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे हे डॉक्‍टर दाम्पत्य आर्थिकदृष्ट्याही सक्षम होते. पत्नी डॉ. सरस्वती स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. सुदाम स्त्रीरोग आणि अस्थिरोग शल्यचिकित्सक असा दुहेरी पदविधारक होता. हॉस्पिटल  बसस्थानकासमोर असल्याने त्याचे रुग्णालय गजबजलेले असायचे. यातून मिळणाऱ्या पैशांवर समाधानी नसलेल्या या दाम्पत्याने पेशाला काळीमा फासायला सुरुवात केली आणि बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात सुरू केले. परळीतील मोजक्‍या आर्थिक सक्षम व्यक्तींपैकी एक असल्याने त्याची राजकीय उठबसही होतीच. याचाच गैरफायदा घेत त्याने महसूल, पोलीस, आरोग्य यंत्रणा आपल्या खिशात असल्याचा आविर्भाव आणला आणि आपल्या या कृत्याचा फैलाव वाढविला होता.

इलेक्ट्रिक DPचा स्फोट, उष्ण ऑईलमुळे होरपळून 4 महिन्यांच्या नातीसह आजीचा मृत्यू

डॉ. सुदाम मुंडे हा राजरोस बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात करत होता. मात्र, त्याने निर्माण केलेल्या दबावामुळे कुठलीही यंत्रणा डोळेझाक करत. डॉ. सरस्वती व डॉ. सुदाम मुंडे हे स्त्रीरोग तज्ज्ञ असले तरी इथे स्त्री रुग्णांवरील उपचार कधी झालेच नाहीत. गर्भलिंगनिदान, गर्भपात यासाठीच हे रुग्णालय कुप्रसिद्ध होते. आरोग्य विभागाने केवळ 10 खाटांची परवानगी दिली असताना या रुग्णालयात 64 खोल्यातून तब्बल 117 खाटा होत्या. राज्यातील विविध भागांसह शेजारच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लोकं येथे येत असत. त्यामुळे अक्षरशः या रुग्णालयात नेहमीच जत्रा भरलेली असायची.

सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना पुढच्या खुर्चीवर बसणारा सुदाम मुंडे इकडे रुग्णालयात राजरोस बेकायदा गर्भातील कळ्या खुडत असे. गर्भपातासाठी लागणाऱ्या विक्रीडिल या औषधींच्या व्हाईल्सची जेवढी जिल्ह्यात मागणी आणि विक्री असे, त्यातली 70 टक्के मागणी आणि उपयोग एकट्या डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयात होत होती. वर्ष 2010 ते 2012 या कालावधीत त्याच्या रुग्णालयात तब्बल तीन हजार 940 एवढ्या गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या विक्रीडिल या औषधींचा वापर झाला. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर थेट आरोप करूनही कुठलीच यंत्रणा दखल घेत नसे.

नाशिक-पुणे महामार्गाबद्दल धक्कादायक माहिती, तब्बल 2700 झाडांची झाली कत्तल!

सुदाम मुंडेने 18 मे 2012 रोजी विजयमाला महादेव पटेकर (रा. भोपा, ता. धारूर) या ऊसतोड मजूर महिलेचा बेकायदा गर्भपात केला. यातच तिचा मृत्यू झाला आणि डॉ. मुंडेच्या पापाचा घडा भरला. या प्रकरणी कलम 304, 312, 314, 315 आणि 316 नुसार गुन्हा दाखल झाला होता. यात पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार, सेक्शन 3A, सेक्शन 9, सेक्शन 17, सेक्शन 29  नुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. या सोबतच एमटीपी कायद्यानुसार सेक्शन 4 आणि 6 चा गुन्हा या दाम्पत्यावर दाखल झाला होता.

एकूण 17 आरोपी या प्रकरणामध्ये होते. त्यातल्या जळगावच्या डॉ. राहुल कोल्हे यांचे अपघाती निधन झाले होते. इतर दोघांचाही दरम्यानच्या काळात मृत्यू झाला होता. या प्रकरणी उर्वरित 11 जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह डॉक्टर दाम्पत्याला न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती.  सहा महिन्यापूर्वी त्याला सर्वोच्च न्यायालयातून जमीन मिळाला होता.

Published by: sachin Salve
First published: September 6, 2020, 3:34 PM IST
Tags: बीड

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading