दुहेरी हत्याकांडाचा खुलासा; भाजीत मिसळल्या होत्या झोपेच्या गोळ्या, अल्पवयीन मुलीनेच रचला कट

दुहेरी हत्याकांडाचा खुलासा; भाजीत मिसळल्या होत्या झोपेच्या गोळ्या, अल्पवयीन मुलीनेच रचला कट

ज्योतिप्रसाद यांच्या 16 वर्षांच्या मुलीने सांगितलं की, मी आई-वडिलांना वैतागले होते.

  • Share this:

इंदूर, 19 डिसेंबर : छोटा बांगडदा येथील रुक्मिणी नगर येथे 15 व्या बटालियनचे सैनिक ज्योतिप्रसाद शर्मा आणि त्यांची पत्नी नीलम यांच्या हत्येचं कारस्थान त्यांच्या अल्पवयीन मुलगीने ( Indore Double Murder Case) आखल्याचे समोर आले आहे. तिला प्रियकर धनंजयबरोबर राहायचे होते. मात्र तिचे आई-वडील तिच्यावर निर्बंध लावत होते. यावर तिने स्वत: त्यांना मारण्याचा कट रचला आणि भाजीमध्ये 12 झोपेच्या गोळ्या मिसळल्या.

दोघेही गाठ झोपताच तिने आरोपी धनंजय यादव (डीजे) याला चाकू घेऊन बोलावले व त्यांची हत्या केली. हत्येनंतर पळून गेलेल्या अल्पवयीन मुलगी आणि प्रियकर धनंजय यांना गुरुवारी रात्री मंदसौरमधील कैलास मार्गावरील हॉटेलमधून अटक केली. रात्री त्यांना इंदूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. डीआयजी हरिनारायणचारी मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, ज्योतिप्रसादची 16 वर्षांची मुलगी केंद्रीय विद्यालयात दहावीत शिकते. दोन वर्षांपासून तिचं गांधीनगर येथे राहणाऱ्या धनंजयशी प्रेमसंबंध होते. पण ज्योती यांना तिच्या मुलीने डीजेला भेटणे पसंत नव्हते. त्यामुळे मुलीने दोघांनाही मार्गातून हटविण्याचा कट रचला.

आदल्या दिवशी 500 रुपयांचा चाकू केला खरेदी

मला ज्योतिप्रसादची अल्पवयीन मुलगी आवडते. मात्र तिचे आई-वडील आम्हाला त्रास देत होते. कधीही मोबाइल तपासतात. दोन दिवसांपूर्वीही आम्हा दोघांना रोहितच्या फ्लॅटमध्ये त्यांनी पाहिले होते. याशिवाय मुलीच्या भावाचे मित्रही माझा पाठलाग करीत होते. मुलीने सांगितले की, त्यांना मारणं गरजेचं आहे. या कटाचा भाग म्हणून, एक दिवस आधी, मी गांधीनगर येथून 500 रुपयांना चाकू विकत घेतला. संध्याकाळी चारच्या सुमारास मी मित्राची स्कूटर घेऊन आलो आणि ज्योती व नीलम यांना ठार मारल्यानंतर मी तेथून पळ काढला, असं आरोपी धनंजय उर्फ डिजेने पोलिसांना सांगितलं.

अल्पवयीन मुलीने सांगितलं सत्य..

यानंतर ज्योतिप्रसाद यांच्या 16 वर्षांच्या मुलीने सांगितलं की, मी आई-वडिलांना वैतागले होते. धनंजयला भेटणं त्यांना पसंत नव्हतं. यामुळे घरातील वातावरणही बिघडलं होतं. रोज आमच्यात वाद होत होता. सुरुवातीला मी डिजेसोबत पळून जाण्याचा विचार केला. मात्र मला वडिलांनी कुठूनही शोधून काढलं असतं. कारण ते पोलिसात आहेत. त्यामुळे त्यांना मारण्याचा निर्णय घेतला.

असा रचला कट...आई-वडिलांसाठी दुसरी भाजी केली..

मुलीच्या आई-वडिलांच्या हत्येसाठी डीजेला तयार करण्यात आलं आणि आदल्या दिवशी त्याच्याकडून झोपेच्या गोळ्या मागवल्या. डिजेने मेडिकल स्टोरमधून झोपेच्या गोळ्या आणण्यासाठी गेला. मात्र डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय त्याला गोळ्या दिल्या नाही. मुलीने जबरदस्ती केली, त्यामुळे त्याने दुसऱ्या गोळ्या आणून दिल्या. ठरलेल्या कारस्थानानुसार त्या दिवशी सायंकाळी मुलीने स्वयंपाक केला. आणि आई-वडिलांसाठी वेगळी भाजी केली. एका भाजीत डिजेने दिलेल्या गोळ्या टाकल्या. ज्योतिप्रसाद दारूच्या नशेत होते. रात्री उशिरापर्यंत ती त्यांच्या झोपण्याची वाट पाहत होती. जसे दोघे गाठ झोपेत गेले, तिने डिजेला बोलावलं. मुलगी दरवाजा उघडून कुत्रा फिरविण्याच्या बहाण्याने बाहेर गेली. डिजे सरळ नीलम जवळ गेला आणि तिच्यावर वार करू लागला. आवाज ऐकून ज्योति बेडरुमबाहेर आले. ते स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र दारुच्या नशेत असल्याने त्यांना स्वत:ला वाचवणं जमलं नाही व त्यांचीही हत्या करण्यात आली.

Published by: Meenal Gangurde
First published: December 19, 2020, 9:54 PM IST

ताज्या बातम्या