रांची, 13 नोव्हेंबर: लव्ह ट्रँगलमधून दोघांची निर्घृण हत्या (Double murder in love triangle case) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याचा ब्रेकअप झाल्यानंतर (Couple separated from each other) या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं होतं. त्यातून पुन्हा नवं प्रेमप्रकरण, त्यातून झालेला संघर्ष आणि अखेर त्यातून खुनाची (Murder of two in love triangel) घटना घडल्याचं समोर येत आहे.
काय आहे प्रकार?
झारखंडच्या रांची परिसरात राहणाऱ्या प्रेम नावाच्या तरुणाचं पूजा नावाच्या तरुणीवर प्रेम होतं. हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्या दोघांनी एका मुलालाही जन्म दिला होता. मात्र तरीही पूजाशी लग्न करायला प्रेम तयार नव्हता. त्यातून दोघांचे वाद होऊन पूजानं घर सोडण्याचा निर्णय घेतला होता.
मुलाला दिला जन्म
लग्नाला नकार दिला तरी पूजानं गर्भपात न करता मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय प्रेमला मान्य नव्हता. मात्र पूजाच्या वडिलांनी तिचा आणि तिच्या मुलाचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही पूजाला सातत्यानं धमकीचे फोन येत असल्याची माहिती तिच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे. पूजाने मुलाला जन्म देणं आणि त्याचा सांभाळ करणं, ही गोष्ट प्रेमला मान्य नसावी आणि त्यामुळे गुंडांकरवी तो त्रास देत असावा, असा संशय कुटुंबीयांना होता.
रस्त्यावर सापडला मृतदेह
घटनेच्या दिवशी धारदार शस्त्राने वार करून पूजा आणि विवेक या दोघांचा निर्घृण खून करण्यात आल्याचं लक्षात आलं. विवेक आणि पूजा यांचे एकमेकांशी नेमके काय संबंध होते, याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही. मात्र त्याच्यासोबत पूजाचा खून झाल्यामुळे त्यामागे लव्ह ट्रँगलचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघांचा खून करण्यापूर्वी त्यांना जबर मारहाण करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे बदला घेण्याच्या उद्देशानंच हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विवेकच्या कुटुंबीयांनाही याबाबत काही माहिती नसून त्यांना आपल्या मुलाच्या हत्येचा जबर धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Jharkhand, Murder Mystery