मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Video Viral : जुगाराच्या अड्ड्यावर महिला पोलिसाची 'डॉन' स्टाईल एन्ट्री; मोबाइलमध्ये Live Raid शूट

Video Viral : जुगाराच्या अड्ड्यावर महिला पोलिसाची 'डॉन' स्टाईल एन्ट्री; मोबाइलमध्ये Live Raid शूट

महिला पोलिसाने एन्ट्री करताच सर्वांची भंबेरी उडाली

महिला पोलिसाने एन्ट्री करताच सर्वांची भंबेरी उडाली

महिलेला पाहून जुगारांची पुरती भंबेरी उडाली. मात्र यामधील एक व्यक्ती तर महिला पोलीस समोर उभी असतानाही पत्ते पिसत असल्याचं दिसत आहे.

इंदूर, 6 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) तसे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेशीर असतात तर काही गंभीर. मात्र काही व्हिडीओ हे वारंवार पाहण्याची इच्छा होते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील इंदूरमधील लाइव्ह छापेमारीचा आहे. व्हिडीओकडे मोठा पुरावा म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे आजकाल तुम्ही पाहिलं असेल तर अनेक घटनांमध्ये लोक मोबाइल काढून व्हिडीओ शूट करू लागतात. मात्र पोलिसांसाठी हे मोठं हत्यार आहे. अनेकदा (CCTV Footage) सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारांचा पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. (Indore News)

हा व्हिडीओ इंदूरमधील जुगाराच्या अड्ड्यावरील आहे. यावेळी एक महिला पोलीस अधिकाऱ्याने जुगाराच्या अड्ड्यावर छापेमारी केली. आणि छापेमारी करीत असतानाचा व्हिडीओ शूट केला. महिला पोलिसाला पाहून जुगार खेळणाऱे पुरते घाबरले. या अड्ड्यावरुन 1 लाखांहून अधिक रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत. (Don style entry of a female police officer at a gambling den Live Raid Shoot in Mobile Video Viral)

" isDesktop="true" id="588923" >

हे ही वाचा-VIDEO: मोबाइलवर बोलत असल्याने अंदाज चुकला; कारच्या धडकेत हवेत उडाली व्यक्ती

राजेंद्र नगर पोलिसांनी रात्री उशिरा या अड्ड्यावर छापेमारी केली. यावेळी घटनास्थळी जुगार खेळणाऱ्या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय 1 लाख रुपयांची कॅशही जप्त करण्यात आली आहे. राजेंद्र नगर पोलीस ठाणे हद्दीतील ट्रेजर टाउन येथे हा अड्डा सुरू होता. अटक केलेल्या आरोपींमध्ये एक व्यापारी असोसिएशनचा अध्यक्षदेखील सामील असल्याचं समोर आलं आहे. यामधील एक व्यक्ती तर महिला पोलीस समोर उभी असतानाही पत्ते पिसत असल्याचं दिसत आहे.

 

First published:
top videos

    Tags: Crime news, Indore News, Live video, Live video viral, Madhya pradesh