एकतर्फी प्रेमाचा कळस! मुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...

डॉनने महिलेच्या पतीवर हल्ला करण्यासाठी जयपूरमध्ये दोन शूटर पाठवले होते.

डॉनने महिलेच्या पतीवर हल्ला करण्यासाठी जयपूरमध्ये दोन शूटर पाठवले होते.

  • Share this:
    मुंबई, 23 जून : एकतर्फी प्रेमात कोण कधी आणि काय करेल काहीच सांगता येत नाही. एकतर्फी प्रेमासाठी कोणाचा जीव घ्यायलाही लोकं मागेपुढे बघत नाहीत. अशीच घटना घडली आहे. मुंबईच्या (Mumbai) एका डॉनने (Don) एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीवर हल्ला केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. या डॉनने महिलेच्या पतीवर हल्ला करण्यासाठी जयपूरमध्ये दोन शूटर पाठवले होते. या हल्लेखोरांनी त्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या मात्र, तो बचावला आहे. ही घटना 16 जूनला घडली. पोलिसांना तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आढळले आहे. त्यामध्ये दोन हल्लेखोर दुचाकीवरून जाताना दिसत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमुळेच ही घटना उघडकीस आली आहे. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य जैन 2018 मध्ये मुंबईत काम करत होता. तो तिथेच कुटुंबीयांसोबत राहायचा. मुंबईत आरोपी डॉन कमलेश शिंदे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर (building contractor) म्हणून काम करायचा. आदित्यचे किराणा दुकान (kirana shop) असल्याने दोघांची ओळख झाली. त्यानंतर तो आदित्यच्या पत्नीशी देखील बोलायला लागला. त्यानंतर कमलेश शिंदे मैत्री (friendship) करण्यासाठी आदित्यच्या पत्नीवर दबाव टाकू लागला. तिने नकार दिल्यानंतर कमलेशने मुलांना मारण्याची धमकी दिली. तिने याबद्दल पती आदित्यला सांगितलं. कमलेशच्या जाचाला कंटाळलेल्या दोघांनी काम बंद केलं आणि ते जयपूरला परतले. जयपूरला गेल्यानंतर त्यांनी मोबाईल नंबर बदलले. 18 डिसेंबरला कमलेश या दोघांचा शोध घेत जयपूरला पोहोचला आणि त्यांना पुन्हा मुंबईला परत येण्यास सांगितलं. हे वाचा - बसमध्ये प्रियकरासोबत संदिग्ध अवस्थेत तरुणी, अर्धनग्न अवस्थेत नेलं पोलीस ठाण्यात जखमी आदित्य हा राजस्थानमधील अवधपुरी, गांधी पथ येथे 16 जून रोजी त्याची गाडी साफ करत होता. त्याच सुमारास दोन अनोळखी तरुण पत्ता विचारण्याचे कारण काढून त्याच्याजवळ आले आणि त्याच्यावर गोळीबार केला. जीव वाचवण्यासाठी आदित्य अपार्टमेंटकडे धावला, तेव्हा त्यांच्या हाताला एक गोळी लागली. काही वेळाने हल्लेखोर गेल्याचे समजून तो अपार्टमेंटच्या बाहेर आला; मात्र या गुंडांनी पुन्हा त्याच्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा आदित्य एका किराणा दुकानात जाऊन लपले. हल्लेखोरांनी दुकानापर्यंत त्यांचा पाठलाग केला. मात्र, आजूबाजूला लोक यायला लागल्यानंतर दोघे हल्लेखोर दुचाकीवर पसार झाले. हे दोघेही सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाले होते. ज्याच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी आदित्यचा जवाबही नोंदवून घेतला. तसेच, मुंबई पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर या दोघांचा शोध घेऊन त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली. मुंबई पोलिसांकडून याबाबत इनपुट मिळताच पोलिसांचे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या गुन्ह्याच्या तपासकामी 21 जून 2021 रोजी राजस्थानमधील करणी विहार पोलीस ठाण्याचे पोलिसांचे एक पथक डोंबिवलीत आले असता कल्याण व उल्हासनगर गुन्हे शाखा कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने मुख्य आरोपी कमलेश याला सापळा रचून देवीचा पाडा डोंबिवली येथून ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी राजस्थान पोलीस पथकाच्या स्वाधीन केले आहे.
    First published: