Home /News /crime /

VIDEO : डोंबिवलीत दुकानात चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

VIDEO : डोंबिवलीत दुकानात चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करीत तपासाला सुरुवात केली आहे.

डोंबिवली, 16 ऑक्टोबर :  चोरट्यांकडून दुकानाचे शटर उचकटून दुकानातील किमती माल चोरून नेण्याच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ झाली आहे. अशीच एक घटना डोंबिवली पूर्वेकडील के.डी.अग्रवाल हॉल नजीक असलेल्या श्रीशा मोबाईल दुकानात घडली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी त्यावाटे आत प्रवेश करून दुकानातील मोबाईल, ब्लूटुथ, पॉवर बॅक आणि रोकड असा 72 हजार 132 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अमोल जगताप यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करीत तपासाला सुरुवात केली आहे. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. या व्हिडिओमध्ये सुरुवातील एक चोर दुकानात प्रवेश करताना दिसत आहे. त्यानंतर त्याच्यामागोमाग त्याचा आणखी एक सहकारी दुकानात प्रवेश करतो. हे दोघेही दुकानातील महागडे मोबाईल चोरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता आसपासच्या दुकानमालकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक काळजी घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Crime news

पुढील बातम्या