पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, रात्री घरी आलेल्या व्यक्तीला नवऱ्याने पाहिले आणि...

दिवाळीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दिवाळीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:
डोंबिवली, 15 नोव्हेंबर : डोंबिवली शहरात 31 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दार ठोठवल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती आहे. दिवाळीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक मोरे या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवली पूर्वे येथील ज्योतीनगर परिसरात राहणाऱ्या दीपक मोरे आणि संजय गवळी या दोघांमध्ये शनिवारी (14 नोव्हेंबर) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि दीपक मोरे याने संजय याच्यावर दगडाने हल्ला चढवला. या घटनेत संजय याचा मृत्यू झाला असून या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी आरोपी दीपक मोरे याला अटक केली आहे. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप आपल्या पहिल्या पत्नीसोबत संजय गवळी याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय आरोपी दीपक मोरे याला होता. यावरुन दोघांमध्ये वाद झाले होते. शनिवारी रात्री संजय याने दीपकचे दार ठोठावले. यानंतर आधीच मनात राग असलेल्या दीपकच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली आणि त्याने दगडाने ठेचून संजय गवळी याची हत्या केली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मयत संजय याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत अशी माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचीन सांडभोर यांनी दिली आहे.
Published by:Akshay Shitole
First published: