मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /डोंबिवली पोलिसांना 1 एप्रिलच्या दिवशी आला फोन, घटनास्थळी पोहोचले आणि....

डोंबिवली पोलिसांना 1 एप्रिलच्या दिवशी आला फोन, घटनास्थळी पोहोचले आणि....

डोंबवली पूर्वेकडील आजदे परिसरात एका बेडशीटमध्ये मृतदेह असल्याचा कॉल मानपाडा पोलिसांना आला.

डोंबवली पूर्वेकडील आजदे परिसरात एका बेडशीटमध्ये मृतदेह असल्याचा कॉल मानपाडा पोलिसांना आला.

डोंबवली पूर्वेकडील आजदे परिसरात एका बेडशीटमध्ये मृतदेह असल्याचा कॉल मानपाडा पोलिसांना आला.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

अजित मांढरे (डोंबिवली), 01 एप्रिल : डोंबवली पूर्वेकडील आजदे परिसरात एका बेडशीटमध्ये मृतदेह असल्याचा कॉल मानपाडा पोलिसांना आला. याबाबत माहिती मिळताच मानपाडा पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बेडशीट उलगडून पाहिले असता या बेडशीटमध्ये कुत्र्याचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.

डोंबिवली पूर्व आजदे पाडा परिसरात एका इमारतीच्या मागे एका बेडशीटमध्ये मृतदेह सदृश्य काही तरी असल्याचे काही स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले .परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी याबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. दुर्गंधी येत असल्याने सुरुवातीला बेडशीटमध्ये मृतदेह असावा असा संशय पोलिसांना होता. बेडशीट उचलून पाहिले असता या बेडशीटमध्ये कुत्र्याचा मृतदेह असल्याचे दिसून आले. आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.

ठाण्यात धक्कादायक घटना

अल्पवयीन मुलाला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी या रितेश दुसाने या नराधमाला अटक केली. या घटनेमुळे पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पीडित मुलगा कल्याण पूर्व परिसरात राहतो. काल दुपारच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेला होता. पीडित मुलाने घरी येण्यासाठी रिक्षा पकडली. तो रिक्षाने घरी आला. मात्र, घराला टाळा असल्याने त्याला रिक्षाला देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तो पुन्हा रिक्षा घेऊन त्याच ठिकाणी आला. रिक्षा चालकासोबत या पीडित मुलाचे बोलणे सुरू असताना रितेश आपल्या दुचाकीवर त्याच ठिकाणी उभा होता. या नरधामाची नजर या मुलावर पडली. त्याने रिक्षाचालकाला रिक्षाचे पैसे देऊ केले. 

मामाचं निघाला क्रूर, भाचीला शौचास नेताना मन परिवर्तन झालं अन् नको तेच घडलं

त्यानंतर पीडित मुलाशी ओळख वाढवली आणि मुलाला घरी सोडतो असे सांगून दुचाकीवर बसवून कल्याण पूर्व येथील एका लॉजवर घेऊन गेला. त्या ठिकाणी पीडित मुलाला कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचं औषध पाजत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी रितेश दुसाने या नराधमाला अटक केली.

First published:
top videos

    Tags: Dombivali, Local18, Mumbai police