Home /News /crime /

परदेशात जाताना आरोपी कोरोना पॉझिटिव्ह, डोंबिवलीतील 65 वर्षीय वृद्धाचं केलं होतं अपहरण

परदेशात जाताना आरोपी कोरोना पॉझिटिव्ह, डोंबिवलीतील 65 वर्षीय वृद्धाचं केलं होतं अपहरण

अखेर मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.

डोंबिवली, 5 जानेवारी : डोंबिवलीतील मानपाडा परिसरात राहणाऱ्या शुभाशिष बॅनर्जी या ६५ वर्षीय वृद्धाचे तिघांनी मिळून अपहरण केले. त्यांच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी करत आणि पैसे दिले नाही तर बॅनर्जी यांना ठार करू अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिली होती. मात्र डोंबिवली मानपाडा पोलिसांनी या अपहरणकर्त्यांच्या तावडीतून वृद्धांची सुटका करून तिघांना अटक केली आहे. शुभाशिष बॅनजी हे बेरोजगारांना परदेशात पाठवून नोकरी लावण्याचे काम करणारे शिपिंग एजंट आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी मनजीत यादव याने तीन तरुणांना परदेशात शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी तीन लाख रुपये दिले होते. बॅनर्जी याने या तीन बेरोजगार तरुणांसाठी श्रीलंकेत शिपिंगमध्ये काम शोधले. त्यांचा व्हिजाही तयार केला. या कामात मनजीत याने दिलेले सर्व पैसे खर्च झाले. या तीन तरुणांची श्रीलंकेत जाण्याची तारीख निश्चित झाली. मात्र तिघांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने तिघांना क्वारंटाईन करण्यात आलं. १५ दिवस क्वारंटाईन असल्याने बॅनर्जीं यांनी श्रीलंकेत जाण्यासाठी जो व्हिजा बनवला होता त्याची मुदत संपली. त्यामुळे या तीन बेरोजगारांना श्रीलंकेत नोकरीसाठी जाता आले नाही. यानंतर बॅनर्जीं यांना हे काम करण्यासाठी दिलेले पैसे मनजीत परत मागू लागला. बॅनर्जीकडे त्याने सातत्याने पैशाचा तगादा लावण्यास सुरुवात केली. मात्र बॅनर्जी याने स्पष्ट सांगितले की, व्हिजा आणि इतर कामात सर्व पैसे खर्च झालेत. मात्र मनजीत ऐकायला तयार नव्हता. त्याचा पैशासाठी तगादा काही थांबला नाही. मग त्याने आपली पैसे वसूल करण्यासाठी आपले दोन साथीदार धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव यांनी बॅनर्जी यांचे अपहरण करण्याचा कट रचला आणि बॅनर्जी यांचे अपहरण केले. हे ही वाचा-मित्रांच्या मदतीने भावाचा घोटला गळा; पोलिसांनाही दिला गुंगारा,बहिणीमुळे झाली अटक अपहरणाची माहिती मिळताच बॅनजी यांच्या पत्नीने मानपाडा पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार दिली. त्या नंतर मानपाडा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. अपहरकर्ते वारंवार बॅनर्जी यांना घेऊन जागा बदलत होते. यादरम्यान मनजीत हा बॅनर्जी यांच्या पत्नीला वारंवार फोन करुन पाच लाख रुपयांची मागणी करीत होता. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारुन टाकण्याची धमकी देत होता. इतकेच नाही तर त्याने अकाऊंट नंबर देऊन त्यात पैसे टाकायला सांगितले. काही पैसे त्यांनी टाकले, शिवाय पोलिसांकडे ज्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले त्याची माहिती होती. त्यानंतर तांत्रिक बाबीचा तपास केला. तेव्हा बॅनर्जी यांना घेऊन हे अपहरकर्ते नालासोपाराच्या गोराई नाकाजवळील एका हॉटेलमध्ये थांबल्याचे पोलिसांना कळले. मग डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या पथकाने हॉटेलमध्ये छापा मारून बॅनर्जी यांची सुटका करून मनजीत यादव आणि त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशमध्ये राहणारे. सध्या डोंबिवलीत वास्तव्यास आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून अधिक तपास पोलिस करत असल्याचे डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी सांगितले.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Corona patient, Dombivali

पुढील बातम्या